घरलाईफस्टाईलपावसाळ्यात निवडा साजेसा परफ्यूम

पावसाळ्यात निवडा साजेसा परफ्यूम

Subscribe

पावसाळ्यामध्ये सौम्य परफ्यूम निवडू शकतात.

वेगवेगळ्या हंगामासाठी आजकाल बाजारात अनेक सुंगधाचे परफ्यूम उपलब्ध असतात. वेगवेगळ्या काळानुसार ट्रेंड्स आणि फॅशन स्टाईल बदलत असतात. या बदलत्या ट्रेंड्सला तरूणाईकडून पसंती मिळत असते. आपण वेगळे ट्रेंड्स, फॅशन स्टाईल फॉलो करतो त्याचप्रमाणे परफ्यूम देखील प्रत्येक हंगामासाठी बाजाराच उपलब्ध असतात. आजकाल बाजारात एकापेक्षा अनेक परफ्यूम उपलब्ध असतात. पण, यामध्ये आवडता आणि तितकाच प्रभावी परफ्यूम कसा निवडायचा? हा प्रश्न सगळ्यांच पडतो.

परफ्यूम

पावसामध्ये कपडे भिजले की, दमट वातावरणामध्ये कपड्यांना कोंदट सुंगध येतो. त्यासाठी पावसाळ्यामध्ये सौम्य परफ्यूम निवडू शकतात. परफ्यूम विकत घेताना काही गोष्टी नक्की विचारात घ्या. ग्रीन अॅपल, व्हाईट रोझ यांसारखे परफ्यूमची निवड तुम्ही करू शकतात. पावसाळा या मौसमासाठी फ्लोरल परफ्यूम आवडत असतील तर रोझ किंवा चेरी ब्लॉसम हे परफ्यूम वापरणे चांगले राहील. हे सर्व सुंगध पावसाळ्यात निवडणे उत्तम राहील.

- Advertisement -

यासोबतच, पावसासाठी जिंजर इसेन्स असलेले परफ्यूमची निवड करणे योग्य राहील. महिलांकरिता पावसाळा हंगामामध्ये कोणताही सोम्य सुंगध असलेल्या परफ्यूमची निवड तुम्ही करू शकतात. मात्र पुरूषांसाठी सिट्रस, मरिन, वूडी, मस्की अशा सुगंधाचे परफ्यूम पावसासाठी उत्तम ठरतील. जास्त आर्द्रता असलेल्या वातावरणात फ्लोरल फ्रेश, अॅक्वा, मरीन, सिट्रस यासारखे साजेशे परफ्यूम्सनां पसंती दिल्यास योग्य ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -