घरलाईफस्टाईलसीताफळ विकत घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

सीताफळ विकत घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Subscribe

तुम्ही कधी ना कधी सीताफळ खरेदी किंवा खाल्ले असेल. सर्वसामान्यपणे सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात सीताफळ मार्केटमध्ये खुप येतात. सीताफळापासून विविध रेसिपीज तयार केल्या जातात. बहुतांश लोक घरी सीताफळाचे झाड घरी लावतात. अशातच काही लोकांना सीताफळ खरेदी करताना ते चांगले आहेत की नाही हे कळत नाही. त्यामुळे सीताफळ विकत घेताना नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊयात.

-आकारावर लक्ष द्या
गोड आणि उत्तम सीताफळ खरेदी करताना त्याचा आकार जरूर तपासून पहा. जेवढा मोठा आकार तेवढ्याच त्यात कमी बिया आणि गोड असते.

- Advertisement -

-काळे आणि डाग लागलेले सीताफळ खरेदी करू नका
जेव्हा कधी सीताफळ खरेदी करायला जाता तेव्हा डाग किंवा काळ्या रंगाचे सीताफळ विकत घेऊ नका. नेहमीच त्याचा रंग हिरवागार असला पाहिजे.

10 interesting health benefits of custard apple | The Times of India

- Advertisement -

-देठ पाहा
सीताफळ खरेदी करताना त्याच्या देठाजवळ एखादा डाग किंवा देठ लगेच निघत असेल तर ते लगेच खराब होऊ शकते. त्याचसोबत सीताफळाजवळ हलका मरुन रंग असेल तरीही ते विकत घेऊ नका.

-अधिक पिकलेले खरेदी करू नका
सीताफळ अधिक पिकलेले कधीच विकत घेऊ नका. लगेच खाणार असाल तरच तसे घ्या. त्याचसोबत अधिक पिकलेले सीताफळ फ्रिजमध्ये स्टोर करा आणि एक-दोन दिवसातच ते खा.

-कच्चे सीताफळ असे पिकवा
कच्चे सीताफळ पिकवण्यासाठी एक भांड घ्या आणि त्यावर जाड टॉवेल किंवा जूटची बॅग ठेवा. त्यावर कच्ची सीताफळ ठेवा आणि वरुन जाड टॉवेल ठेवा. सिताफळाला उब मिळाल्यानंतर ते पिकतात.

-असे करा स्टोर
सीताफळ अधिक गरम ठिकाणी ठेवण्यापासून दूर रहा. त्यामुळे ते फ्रिजमध्ये ठेवणे बेस्ट पर्याय आहे. सीताफळ आधिच पिकलेले असे तर त्याला गरम ठिकाणी ठेवणे टाळा. सीताफळ कच्चे असेल तर त्याला जाड कापडात झाकून ठेवा.


हेही वाचा- गुलाब पाणीच नव्हे गुलाबाचे तेल देखील अत्यंत फायदेशीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -