घरलाईफस्टाईल'वर्किंग वूमन'ने असा घ्यावा आहार

‘वर्किंग वूमन’ने असा घ्यावा आहार

Subscribe

वर्किंग वूमनचा डाएट प्लॅन

सध्याच्या धक्काधकीच्या जिवनात सर्वांची काळजी घेणारी घरातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे महिला. मग ती महिला गृहिमी असे किंवा नोकरी कराणारी असो. घरातील स्त्रिया ज्या नेहमीच दुसऱ्यांचा विचार करतात. मात्र यामध्ये तिची मात्र चांगलीच तारांबळ उडते. यामुळे ती स्वत:च्या आहाराकडे दुर्लक्ष करते आणि याचा फटका तिच्या आरोग्यावर होतो. आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे पोषक तत्त्वांची कमी होऊन रोग प्रतिकारक क्षमता देखील कमी होते आणि यामुळे अनेक प्रकाराच्या आजारांना समोर जावे लागते. अनेक वर्किंग महिला आपल्या जेवणाकडे दुर्लक्ष करतात. परंतू याने पचन संबंधी समस्या उद्भवतात ज्यात गॅसची समस्या, बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी यांचा समावेश होतो. मात्र या वर्किंग वूमने एका विशिष्ट पद्धतीनुसार जेवण केल्यास गृहिणीसह वर्किंग वूमन देखील फिट राहू शकतात.

सकाळचा नाश्ता
सकाळचा नाश्ता कधीही टाळू नये. कारण दिवसभर काम करण्यासाठी लागणार्‍या ऊर्जेसाठी सकाळचा नाश्ता फार महत्त्वाचा आणि अत्यंत आवश्यक असतो. कारण कामामध्ये दिवसभरात दुपारे जेवण केव्हा होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे घरातून निघताना ब्रेकफास्ट करुनच बाहेर पडावे. सकाळच्या नाश्तामध्ये दूध, सांजा, कॉर्नफ्लॅक्स, सँडविच, ऑम्लेट ब्रेड किंवा चपाती रोल यापैकी तुम्ही काहीही सकाळच्या वेळेस घेऊ शकता. या व्यतिरिक्त एखादे सफरचंद आणि एक ग्लास दूधही घेता येऊ शकते. तर काहींना सकाळच्या वेळेत कामावर जाण्याच्या गडबडीत वेळ नसतो अशावेळी ड्राय फ्रूट्ससोबत एक ग्लास दूधही घेता येऊ शकते.

दुपारचे जेवण

- Advertisement -

वर्किंग वूमन एकदा घरातून नाश्ता करुन बाहेर पडल्या का त्या दुपारचे जेवण केव्हा करतील ही वेळ ठरलेली नसते. हातातील काम झाली का लंच घेतल जात. मात्र दुपारचे जेवण देखील तितकेच महत्त्तवाचे असते. जेवणाची १२ ही वेळ योग्य असते. परंतु नोकरी वरच्या महिलांना ती वेळ पाळण कठीण असते. मात्र, दुपारच्या जेवणाची वेळ जरी टुकली तरी देखील दुपारचे जेवण योग्य असाव. दुपारच्या जेवणात वरण, भात, चपाती, कोशिंबीर, दही हे सामील असावे. त्यासोबत हिरव्या भाज्या, पनीर आणि अधिक व्हिटामिन, फायबरचा समावेश असलेल्या पदार्थांचे अधिक सेवन करावे. यामुळे आरोग्य देखील चांगले राहते आणि प्रतिकारशक्ती देखील वाढते.

 

स्नॅक्स

सायंकाळचा स्नॅक्स हा तितकासा गरजेचा नसतो. मात्र, काहींना सतत काहीकरी खाण्याची सवय असते. अशा व्यक्तींनी स्नॅक्ससाठी बाहेरील फास्टफूड खाणे टाळावे. चटपटा हव असल्यास खाकरा, थेपले, चणा मसाला, कुरमुरे, सुखी भेळ हे खाऊ शकता. तसेच चटपटा पदार्थ खाण्याचा कंटाळा आला असल्यास एकादे फळ खाल्यास पोट देखील भरते.

 

रात्रीचे जेवण

रात्रीचा आहार हा हलका असावा. रात्रीच्यावेळी हलक जेवल्यास ते पचण्यास देखील सोपे जाते. मात्र रात्रीच्या जेवणात १ ते २ पोळी आणि भाजीचा समावेश असावा. एखाद्यावेळेस रात्रीचा आहार न घेतल्यास त्यावर त्यावेळी एक कोणतेही फळ आणि १ ग्लास दूध प्यायल्याने देखील पोट भरण्यास मदत होते. तसेच या हलक्या जेवणामुळे पचनशक्तीवर देखील कोणताही परिणाम होत नाही.

प्रोटीन्स, कॅलरीजयुक्त आहार करावा

महिलांनी सर्वप्रथम स्वत:ची काळजी घ्यावी. कारण त्यांचे आरोग्य चांगले राहिल्यास त्या इतर घरातील सदस्यांची काळजी घेऊ शकतात. त्यामुळे वेळच्या वेळी आहार घेणे. अत्यंत महत्त्वाचे असून विशेष करुन आहारात अधिकाअधिक प्रोटीन्स आणि कॅलरीजयुक्त घटक असलेल्या पदार्थांचा सर्वाधिक समावेश करावा. तसेच व्हिटामिन ए आणि डीचा समावेश असलेले पदार्थ खावे यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.  डॉ. रुतिका मुरुडकर, आहार तज्ज्ञ, नारायणदास मोरबाई बुधरानी ट्रस्ट

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -