घरलाईफस्टाईलHome Shifting Tips : असे करा बजेट नुसार शिफ्टींग

Home Shifting Tips : असे करा बजेट नुसार शिफ्टींग

Subscribe

घर शिफ्ट करण्यापूर्वी तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यासोबतच घराचे शिफ्टिंग योग्य प्रकारे नियोजन करून केले, तर फारसा पैसा खर्च होत नाही. अशातच जर तुम्ही घर शिफ्ट करणार असाल, तर तुम्ही या बजेट-फ्रेंडली पद्धतीने घराचे शिफ्टिंग करू शकतात. तर आता आपण बजेट नुसार शिफ्टींग कसे करू शकता या बद्दलच्या काही टिप्स जाणून घेऊया…

Professional Packers and Movers in 2022 - Articles Theme

- Advertisement -

1. रेडी टू मूव इन पॅकेज बनवा

नवीन घरात शिफ्ट होऊन नवीन जागा सेट करायला खूप वेळ लागतो. यासाठी रेडी-टू-मूव्ह-इन पॅकेजेस घेणे चांगले. यासाठी तुम्हाला फक्त बजेटची काळजी घ्यावी लागेल. याशिवाय तुम्हाला हेही लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही जिथे जाणार आहेत तिथेचा आजूबाजूला सुविधा आहेत का ? जेणेकरून घर शिफ्ट केल्यानंतर तुम्हाला सामान आण्यासाठी लांब जावे लागणार नाही. तसेच तुमचा यामुळे खर्चही वाचेल.

2. सामान शिफ्टिंगसाठी मूव्हर्स आणि पॅकर्सचा करा वापर

तुम्ही घर बदलण्याच्या दिवसापूर्वी किमान 10 दिवस अगोदर सुरुवात करावी. या प्रक्रियेतील पहिली पायरी म्हणजे अनावश्यक वस्तूंपासून मुक्त होणे. यामुळे तुमच्या घरातील सामानाचे प्रमाण कमी होईल आणि पॅक आणि शिफ्ट करणे सोपे होईल. यासोबतच फर्निचरचे छोटे तुकडे जसे की फर्निचर, स्वयंपाकघरातील वस्तू, सोफा सेट इ. मूव्हर्स आणि पॅकर्ससह सहजपणे पटकन बदलण्यात येतात. अशामुळे तुमचा खर्चही कमी होईल आणि तुम्ही एकाच वेळी तुमचे सामान दुसऱ्या घरात नेऊ शकाल. तसेच तुम्हाला अनेक मूव्हर्स आणि पॅकर्सचे ऑनलाइन डिटेल्स सापडतील ज्यांच्याशी तुम्ही सहज संपर्क साधू शकता.

- Advertisement -

3. पॅकिंगवर जास्त पैसे खर्च करू नका

जर तुम्हाला स्टोअरमधून ब्राऊन पॅकेजिंग बॉक्स विनामूल्य मिळत असतील तर ते वेगळे खरेदी करू नका. याशिवाय, तुम्ही तुमच्या शेजारच्या लोकांकडून बॉक्सेस मागू शकता किंवा तुम्ही सोशल मीडिया साइट्सवर लोकांशी कनेक्ट होऊन त्यांच्याकडून मोठे बॉक्स मिळवू शकता. अशातच तुमच्या स्थानिक रीसायकलिंग केंद्राकडे देखील तुम्ही मोफत विनामूल्य बॉक्ससेस घेऊ शकता आणि ते तपासून वापरू शकता. याशिवाय तुम्ही ऑनलाइन स्टफ बॉक्स देखील मोठ्या सामानासाठी वापरू शकता.

________________________________________________________________________

हेही वाचा :

पावसाळयात घराच्या भिंतीबरोबरच फर्निचरची अशी घ्या काळजी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -