घरलाईफस्टाईलचॉकलेट आप्पे

चॉकलेट आप्पे

Subscribe

चॉकलेट आप्पे रेसिपी

बऱ्याचदा आपण तिखट आणि गोड आप्पे कसे बनवतात हे पाहिले आहे. पण, आज आपण चॉकलेट आप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत.

साहित्य

- Advertisement -
  • १ वाटी मैदा
  • १/२ वाटी पिठी साखर
  • पाव वाटी चॉकलेट पावडर
  • १/२ वाटी दही
  • १/२ वाटी बटर / तुप
  • १/४ चमचा बेकिंग पावडर
  • १/४ चमचा बेकिंग सोडा
  • १/४ चमचा चॉकलेट ईसेन्स / व्हॅनिला ईसेन्स
  • दूध (१००मिली)

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात बटर, दही एकत्र करुन चांगले एकजीव करुन घ्या. आता त्यामध्ये मैदा, पिठी साखर, चॉकलेट पावडर एकत्र करुन घ्या. त्यानंतर त्यात व्हॅनिला ईसेन्स, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घाला आणि लागेल तसे दूध घालून एकत्र करुन २ मिनीटे छान फेटून घ्या. तयार मिश्रण ५ मिनिटे तसेच ठेवा आणि त्यानंतर आप्पे पात्राला तेल लावा. आता तयार केलेले मिश्रण आप्पे पात्रात घाला. बारीक गॅसवर ३ ते ४ मिनीटे आप्पेपात्र झाकून ठेवा. त्यानंतर आप्पे दुसऱ्या बाजूने ३ ते ४ मिनीटे गरम करुन घ्या, अशा प्रकारे चॉकलेट आप्पे तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -