घरलाईफस्टाईलवजन घटवण्यासाठी सुलभ व्यायाम!

वजन घटवण्यासाठी सुलभ व्यायाम!

Subscribe

जाणून घ्या वजन घटवण्यासाठी कोणते व्यायाम करावे.

तुम्ही आरोग्याविषयी जागरुक आहात. डाएट करत आहात. त्याचबरोबर खाण्यापिण्यावरही तुमचं निय़ंत्रण आहे. जिमही करत आहात. पण, तरीही तुमचे वजन कमी होत नाही. अशावेळी असे काही व्यायामप्रकार करा, ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहिल आणि वजन घटवण्यास मदत देखील होईल.

पोट कमी होण्यासाठी

- Advertisement -

बऱ्याच व्यक्ती अंगाने बारीक असल्या तरी मात्र, त्यांचे पोट हे जास्त असते. हेच पोट कमी करण्यासाठी एक सोपा उपाय आहे. बसताना, उठताना, लिहीत वा चालत असताना पोट आत ओढावे. श्वासही जेवढा वेळ आत धढता येईल, तेवढा ओढावा आणि सोडावा, असे नियमितपणे करावे आणि जमेल तितका श्वास आत ओढण्याची वेळ वाढवावी. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

बेडूक उड्या

- Advertisement -

बेडूक उड्या मारण्यास बसतो, तसे बसावे आणि दोन्ही पाय आणि हात यावर समप्रमाणात भार टाकावा. श्वास आत घ्यावा. डोके खाली घालावे. नितंब आत घेऊन पाठ आत ओढावी. श्वास सोडावा आणि पाठ मोकळी; पण, सपाट सोडावी.

सायकलिंग

प्रत्येकीने व्यायामाच्या प्रकाराची निवड करताना तो आपल्या देहदृष्टीनुसार निवडावा. सायकलिंग, जॉगिंग, पायी चालणे आदी प्रकारचे व्यायाम अधिक करावेत. यामुळे शरीर आणि मन यो दोहोंत स्फूर्ती राहते.

पायी चालणे

भराभर पायी चालणे हा व्यायामाचा सर्वात सोपा आणि तेवढाच परिणामकारक प्रकार आहे. यामुळे कॅलरीज तर खर्च होतात. पण, त्याचबरोबर रक्तदाब आणि हृदयाचे कार्यही नियंत्रित राहते. म्हणूनच रोज सकाळ – संध्याकाळ फिरायला जाणे आवश्यक असते. आपल्या सर्वांगात स्फूर्ती, उत्साह आणि तरतरी आणण्यास याचा खूपच उपयोग होतो. चिडचिडेपणा, अकारण येणारा राग यावरही नियंत्रण राहते. ताठ, भराभर आणि मान सरळ आणि ताठ ठेवून चालावे. पायही ताठ असावेत. चालताना देह पुढे झुकवू नये आणि गती समान ठेवावी, हे महत्त्वाचे आहे.

जीना चढणे – उतरणे

जर पायी चालणे होत नसेल तर जिना चढणे – उतरणे हा व्यायाम करावा. यामुळे शरीरास श्रम पडून चेतापेशी लवचिक आणि मजबूत बनतात. तसेच कार्यक्षमता वाढून वात कमी होतो. शरीरातील अनावश्यक चरबीही कमी होण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -