घरलाईफस्टाईल'हे' पदार्थ ठरतील साखरेला पर्याय

‘हे’ पदार्थ ठरतील साखरेला पर्याय

Subscribe

साखरे ऐवजी या पदार्थांचा वापर करा.

साखर ही आरोग्याला धोकादायक आहे. मात्र, असे असले तरी साखरेचा वापर केला नाही तर गोडवा कुठून येणार हा देखील प्रश्न पडतो. मात्र, असे काही पाच पर्याय आहेत ज्याचा साखरेऐवजी वापर करता येऊ शकतो आणि पदार्थ गोड देखील होतो. चला तर जाणून घेऊया साखरेला कोणते पर्याय आहेत. ज्यामुळे गोडवाही मिळतो आणि आरोग्यास नुकसान देखील होत नाही.

खडीसाखर

खडीसाखर ही आरोग्यासाठी देखील वापरली जाते. कारण यामध्ये पोषक तत्वेदेखील असतात. त्यासोबतच यामध्ये कॅल्शियम आणि खनिज असते. ते रिफाइन केले नसल्यामुळे शरीरासाठी लाभदायक आहे.

- Advertisement -

खजूर

खजूर एक उत्तम पर्याय आहे. कोरड्या खजुरांना बारीक करुन साखरेऐवजी त्याचा तुम्ही वापर करु शकता. तसेच ही पूड चॉकलेट, पेस्ट्री, सांजा किंवा इतर पदार्थांमध्ये वापरली जाऊ शकते. याच्या सेवनामुळे हाडे मजबूत होतात.

गूळ

गूळ हा साखरेला एक उत्तम पर्याय आहे. कारण गुळाला शुद्ध करत नसल्याने यातून जीवनसत्त्वे, खनिजांसह पोषकद्रव्ये मिळतात. याचे गुणधर्म उष्ण असल्याने सर्दी खोकल्यासाठी उपयुक्त आहे.

- Advertisement -

कच्चा मध

कच्चा मध एक चांगला पर्याय आहे. बाजारात मिळणाऱ्या मधाऐवजी कच्चा मध घेतल्यास यातून गोडव्यासह वजन कमी होण्यास देखील मदत होते.

नारळी साखर

नारळाच्या झाडामधून निघणाऱ्या गोड द्रव्यापासून तयार केली जाते. त्याला नारळी साखर बोलतात. यात साखरेसारख्या कॅलरीज असल्या तरी ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा कमी असते. जे आपण सहज पचवू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -