घरलाईफस्टाईलकॉकटेल शेक रेसिपी

कॉकटेल शेक रेसिपी

Subscribe

कॉकटेल शेक

सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे सातत्याने काहींना काही थंडगार सेवन करण्याची इच्छा होते. मात्र, अशावेळी नेमके काय सेवन करणार असा देखील प्रश्न पडतो. कारण थंडगार म्हटलं कि, लिंबू सरबत, कोकम सरबत आणि फालुदा एवढेच पर्याय आपल्याला आठवतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला कॉकटेल शेक कसा बनवायचा ते सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया कॉकटेल शेकची रेसिपी.

साहित्य

  • ऑरेंज क्रश २ चमचे
  • किवी क्रश १ चमचा
  • व्हॅनिला आइस्क्रीम २ स्कूप
  • पायनॅपल क्रश ३ चमचे
  • दूध अर्धा कप
  • स्ट्रॉबेरी क्रश २ चमचे
  • बर्फाचे तुकडे आवडीनुसार

कृती

प्रथम एका ग्लासमध्ये स्ट्रॉबेरी क्रश घालून तो ग्लास फ्रिजमध्ये पाच मिनिटं ठेवा. नंतर मिक्सरमधून ऑरेंज, किवी, पायनॅपल, स्ट्रॉबेरी क्रश हे सर्व चांगले एकजीव करून घ्या. नंतर त्यात व्हॅनिला आइस्क्रीम टाकून हलवून घ्या. फ्रिजमध्ये ठेवलेला स्ट्रॉबेरी क्रशचा ग्लास काढून त्यात बर्फाचे तुकडे घालून त्यात मिक्सरमधून काढलेला मॉकटेल शेक घाला. स्ट्रॉ घालून सर्व्ह करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -