घरलाईफस्टाईलहिवाळ्यात खा ऊर्जा देणारे पदार्थ

हिवाळ्यात खा ऊर्जा देणारे पदार्थ

Subscribe

हिवाळ्यात आपली शरीरबांधणी वेगाने होते. शरीरात नवीन पेशींची उत्पत्ती, उत्क्रांती होते. पुढच्या ऋतूसाठी शरीर तयार होत असतं. म्हणूनच शरीरास पोषण देणार्‍या सर्व पदार्थांना प्राधान्य द्यायला हवं.

आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिवाळा हा उत्तम ‘ऋतू’ आहे. हिवाळ्यात आपली भूक वाढते त्यामुळे शरीराचं इंजिन उत्तम प्रकारे कार्यरत होतं. अन्नपचनाची प्रक्रिया सुधारते आणि म्हणूनच, पोषणदायी पदार्थांची गरज वाढते. थंड वातावरणाशी जुळवून घेऊन, योग्य समतोल राखून, शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी जास्त उष्मांक म्हणजेच कॅलरीजची गरज असते. आहाराचं प्रमाण खूप जास्त न वाढवता, नेहमीच्या आवश्यक कॅलरीजपेक्षा फक्त ५-१० टक्केे जास्त कॅलरीज शरीरास उत्तम ठरते.

आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिवाळा हा उत्तम ‘सीझन’ आहे. हिवाळ्यात आपली भूक वाढते. शरीराचं इंजिन उत्तम प्रकारे कार्यरत होतं. अन्नपचन सुधारतं आणि म्हणूनच, पोषणदायी पदार्थाची गरज वाढते. थंड वातावरणाशी जुळवून घेऊन, योग्य समतोल राखून, शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी जास्त उष्मांक म्हणजेच कॅलरीजची गरज असते. पण या सुमारास दिवस छोटा असतो, पहाटे आणि संध्याकाळी थंड हवामान असतं. त्यामुळे घराबाहेर करायचे व्यायाम कमी केले जातात. घरात निष्क्रिय बसण्याचं किंवा झोपण्याचं प्रमाण वाढतं.

- Advertisement -

शरीराचं तापमान योग्य राखण्यासाठी, नेहमीच्या खाण्या-पिण्याबरोबरच त्वरित ऊर्जा देणारे पदार्थ आहारात हवेत. हिवाळ्यात ऊर्जा देणारे पदार्थ खाल्ल्याने होणारे फायदे –

*बाजरी, मका, सोयाबीन, राजगिरा, शिंगाडा- यांचा वापर आवर्जून करावा. या पदार्थामधून भरपूर उष्णता आणि प्रोटीन्स मिळतील.

- Advertisement -

*आळीव आणि डिंक हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत.

*साखरेऐवजी गूळ, गुळाचा चुरा किंवा मध वापरला तर उष्णता आणि खनिजं मिळतील.

*सुरण, रताळी, बटाटा या जमिनीखाली तयार होणार्‍या कंदमुळांमधून आवश्यक ऊर्जा आणि काही व्हिटॅमिन्स मिळतील.

*खजूर, सुकं अंजीर, जर्दाळू, काळ्या मनुका, खारीक, बेदाणे या सुक्या मेव्यातून ऊर्जेबरोबरच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -