घरलाईफस्टाईलउत्तम नोकरी मिळवण्यासाठी 'या' टिप्स पाहा

उत्तम नोकरी मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स पाहा

Subscribe

करियरच्या सुरुवातीला तुम्हाला जर उत्तम कंपनीत नोकरी मिळाली तर तुमचा फायदा होऊ शकतो. मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना सुरुवातीलाच उत्तम पगार सुद्धा देतात. अशातच तुम्हाला सुद्धा उत्तम नोकरीची अपेक्षा असेल तर पुढील काही टीप्स जरुर फॉलो करा. याच्या मदतीने तुम्हाला उत्तम नोकरी मिळण्यास फायदा होईल.

Resume बनवताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्यानुरुप तुम्ही तुमचा रेज्युमे तयार करा. भले तुम्ही फ्रेशर्स असाल आणि तुमचा रेज्युमे व्यवस्थितीत असेल तर नक्कीच तुमचे सिलेक्शन होऊ शकते. रेज्युमे बनवताना पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा.

- Advertisement -

-फोन क्रमांक लिहा
-कामाचा एक्सपिरियंस लिहा
-प्रोजेक्ट्स लिहा
-शिक्षणासंदर्भात माहिती लिहा
-स्किल्स लिहा
-ऑब्जेक्टिव्ह लिहा

- Advertisement -

सोशल मीडियाच्या साइटवरुन शोधा नोकरी
सोशल मीडियाचा वापर केवळ फोटो आणि व्हिडिओसाटी नव्हे तर नोकरी शोधण्यासाठी सुद्धा केला जातो. Linkdin सारख्या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला नोकरी मिळू शकते. या साइटवर तुम्हाला मात्र अॅक्टिव्ह रहावे लागेल आणि स्वत:सह माहिती सुद्धा शेअर करत रहावी लागेल. ऐवढेच नव्हे तर मोठ्या कंपन्या सुद्धा येथे नोकरीसंदर्भात पोस्टिंग करत असतात. अशातच तुम्हाला नोकरीसाठी अप्लाय करण्याचा ऑप्शन उपलब्ध होईल.

काहीतरी नवीन करा
जर तुम्हाला एकच काम येत असेल तर नोकरी मिळण्यास समस्या उद्भवू शकते. मात्र एक्ट्रा अॅक्टिव्हिटी मध्ये सुद्धा तुम्ही हुशार असाल तर नक्कीच नोकरी मिळू शकते. त्यामुळे नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याची तयारी ठेवा.


हेही वाचा- सोशल मीडियात फॉलोअर्स वाढवणे पडू शकते भारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -