घरमनोरंजनMylek Movie : विशेष मुलांसाठी, पालकांसाठी 'मायलेक'चे स्पेशल स्क्रिनिंग

Mylek Movie : विशेष मुलांसाठी, पालकांसाठी ‘मायलेक’चे स्पेशल स्क्रिनिंग

Subscribe

Mylek Movie Special Screening : ‘मायलेक’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. गाणीही सध्या ट्रेण्डिंगमध्ये असून त्यावर ‘मायलेकीं’चे रिल्सही झळकत आहेत. चित्रपट पाहाताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणवत आहेत. चित्रपटाची कथा, अभिनय सगळ्यांचेच कौतुक होत आहे. दरम्यान, सोनाली खरे आणि ‘सोसायटी फॉर दि एज्युकेशन ऑफ दि चॅलेन्जेड’ या संस्थेने या विशेष मुलांसाठी ‘मायलेक’च्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन केले होते. यावेळी अनेक पाल्य- पालकांनी, संस्थेतील शिक्षकांनी हा चित्रपट एन्जॉय केला.

याबद्दल सोनाली खरे म्हणते, “प्रत्येक आईला आपली मुले प्रिय असतात आणि प्रत्येक मुलाचे आपल्या आईवर प्रेम असते. आज इथे जमलेल्या पाल्य- पालकांना बघून खूप छान वाटले. त्यांनी हा चित्रपट आवडीने पाहिला, त्यावर प्रतिक्रिया दिल्या, हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. ‘सोसायटी फॉर दि एज्युकेशन ऑफ दि चॅलेन्जेड’ या संस्थेचेही मी आभार मानते, कारण त्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले.”

- Advertisement -

 या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, शुभांगी लाटकर, संजय मोने, बिजय आनंद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत, सोनाली आनंद निर्मित, प्रियांका तन्वर दिग्दर्शित आहे. कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते असून नितीन प्रकाश वैद्य ‘मायलेक’चे असोसिएट प्रोड्यूसर आहेत.

या चित्रपटात तीन पिढ्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक म्हणजे सोनाली खरे आणि सनाया आनंद. दुसरी मायलेकीची जोडी म्हणजे सोनाली खरे आणि तिची आई कल्पिता खरे. या तिघींना एकाच चित्रपटात पाहून सगळ्यांनाच आनंद झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Vidya Balan: मी दान करत नाही, विद्या बालन स्पष्टच बोलली; देशात धार्मिक ध्रुवीकरण झालंय…

______________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -