घरलाईफस्टाईलतंदरुस्त राहण्यासाठी करा 'या' फळांचे सेवन

तंदरुस्त राहण्यासाठी करा ‘या’ फळांचे सेवन

Subscribe

तंदरुस्त राहण्यासाठी या फळांचे नक्की सेवन करा.

बऱ्याचदा आजारी पडल्यावर अनेक जण फळांचे सेवन करतात. मात्र, केवळ आजारी पडल्यावरच फळांचे सेवन न करता. दररोज फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. फळांमध्ये इतके विविध प्रकारचे गुणधर्म आहेत की निरोगी राहायचे असेल तर फळांचे सेवन नियमितपणे केले पाहिजे. आहारात विविध प्रकारच्या फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फळांमध्ये ९० ते ९५ टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. त्यामुळे फळांचे दररोज सेवन करावे. त्याचा अधिक चांगला फायदा होतो.

केळी

- Advertisement -

बाजारात बाराही महिने उपलब्ध असणारे फळ म्हणजे केळी. स्वस्त आणि मस्त असे हे फळ व्हिटॅमिनने भरलेले आहे. या फळामध्ये अनेक गुणधर्म आहेत. व्हिटॅमिनने भरलेली केळी, अँटी-ऑक्सीडेंटसचा नॅचरल सोर्स आहे.

स्ट्रॉबेरी

- Advertisement -

स्ट्रॉबेरी हे फळ सर्वांच आवडते असे नाही. मात्र, व्हिटॅमिन सी, सिलीकॉनिक अॅसिड आणि अँटी-ऑक्सीडेंट असल्यामुळे स्ट्रॉबेरी अॅक्सफोलिटिंग फायद्यासाठी सुध्दा ओळखली जाते. यासोबतच चेहऱ्यावरील पिंपल्स नष्ट करण्यासाठी फायदेशीर आहे.

डाळिंब

बऱ्याचदा डाळिंब हे फळ आजारी व्यक्तीला दिले जाते. मात्र, हे फळ दररोज खाल्ल्याने अधिक फायदा होतो. ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते. डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अ‍ॅनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे. तसेच अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.

सफरचंद

दररोज एक तरी सफरचंद खावे. यात पोटॅशियम, ग्लूकोज, फॉस्फरस, लोह, ईथर इ. उपयुक्त द्रव्ये असतात. याच्या सालातही खूप महत्वपूर्ण क्षार असतात. त्यामुळे हे अमृताप्रमाणेच मानावे. याखेरीज यात ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वेही असतात. ज्याचा आरोग्यास अधिक चांगला फायदा होतो.

संत्रे

या फळात मुबलक प्रमाणात ‘क’ जीवनसत्व असते हे रेशदार फळ असते. याचा गर, रस, साले या सर्वांचा उपयोग सौंदर्य-वर्धनासाठी होतो. याची ताजी साल नेहमी हात, पाय, चेहरा, यावर जरा चुरडून चोळावी. त्यांना ‘क’ जीवनसत्व मिळते. रोज एक संत्रे खाल्ल्याने दिवसभरात शरीराला लागणारे व्हिटामिन सी मिळते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -