घरलाईफस्टाईललॉकडाऊनमध्ये कंटाळा आलाय, मग ताडासन करा!

लॉकडाऊनमध्ये कंटाळा आलाय, मग ताडासन करा!

Subscribe

ताडासन केल्यास कंटाळा दूर होतो.

देशात लॉकडाऊन लागू करुन आता एक महिना होत आला आहे. त्यामुळे अनेकांना घरात राहून काय करावे सुचत नाही. दररोज काय करणार या विचाराने अक्षरश: कंटाळा आला आहे. मात्र, हा कंटाळा तुमचा सहज दूर होईल. याकरता तुम्ही घरच्या घरी ताडासन करु शकता. यामुळे तुमचा कंटाळा सहज दूर होण्यास मदत होते.

ताडासनचे फायदा

- Advertisement -

ताडासन नियमित केल्याने पायंचे स्नायू आणि पंजे मजबूत होतात. तसेच छाती आणि पोट यांच्यावर ताण पडल्याने त्यांच्या संदर्भात असलेले आजार दूर होतात. त्यासोबतच वीर्यशक्तीमध्ये वाढ होऊन मूळ्याध असलेल्या व्यक्तीला यापासून आराम पडतो. त्यासोबतच दिवसभर ऊर्जा मिळते.

ताडासनची पद्धत

- Advertisement -

ताडासन हे सरळ उभे राहून केले जाते. त्यानंतर पायाची बोटे आणि पंजे समांतर ठेवून उभे राहावे. त्यानंतर हळूहळू हात खांद्यापर्यंत आणून त्यांना डोक्याच्या वर नेताना केवळ तळपायांवर उभे राहावे. त्यानंतर हाताच्या पंज्यांना विरुद्ध दिशेने नेऊन मान सरळ ठेवून पुन्हा होते त्या दिशेने उभे राहावे.

अशी घ्यावी सावधगिरी

ताडासन करताना सावधगिरी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ताडासन करताना हात डोक्याच्या दिशेने नेत असताना लक्षात ठेवायचे की, हाताची बोटे देखील सरळ रेषेत ठेवावीत. या अवस्थेत शरीराचे वजन हे पायाच्या बोटांवर असते. मात्र, हातांना वरच्या बाजूला नेतात तेव्हा मात्र, पोट हे आतल्या बाजूला घेतले पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -