घरलाईफस्टाईल'असं' ठेवा कोरोनापासून आपल्या घराला दूर

‘असं’ ठेवा कोरोनापासून आपल्या घराला दूर

Subscribe

कोरोनापासून आपल्या घराला ठेवा दूर

सध्या कोरोनापासून दूर राहण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. बरेच जण आपल्या पातळीवर खबरदारी घेत आहेत. मात्र, यावेळी आपण केवळ आपली खबरदारी घेताना दिसत आहोत. परंतु, हा कोरोना विषाणू घरात घुसून कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याला संसर्ग करु शकतो. त्यामुळे आपण आपल्या घराला या विषाणूपासून कसे दूर ठेऊ शकतो. ते पाहणार आहोत.

स्वच्छतेची काळजी घ्या

- Advertisement -

सर्वप्रथम घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच एखादी जागा अस्वच्छ असेल तर ती जागा साबणाच्या पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर जंतुनाशक द्रावणाच्या मदतीने ते स्वच्छ करुन घ्या.

ओलसर जागा सुकण्यास ठेवा

- Advertisement -

साफसफाई करुन ओला झालेला भाग काही वेळ तसाच ठेवला. थोडावेळ तिथे जाऊ नका.

दारे – खिडक्या खुल्या ठेवा

साफसफाई करताना दारे आणि खिडक्या खुल्या ठेवा.

अस्वच्छ कपड्यांना हात लावू नका

कपडे धुताना अस्वच्छ कपड्यांना हात लावणे शक्यतो टाळा. हातात हातमोजे आणि तोंडाला मास्क लावा. तसेच संशयास्पद कपड्यांना काळजीपूर्वक स्पर्श करा. आजारी कपड्यांसह इतर कपडे धुऊ नका.

अधिक स्पर्श करणाऱ्या वस्तू स्वच्छ करा

साबणाच्या पाण्याने घराची पृष्ठभाग किंवा मजला धुवा अधिक स्पर्श करणारी पृष्ठभाग स्वच्छ करा. उदा. खुर्ची, टेबल, दाराचे हँडल, स्विच फोन कीबोर्ड, नळ आदी गोष्टी स्वच्छ करा.

आजारी व्यक्तीची खोली साफ करा

घरात कोणी आजारी असेल तर त्याची खोली वेगळी करा शक्य असल्यास वेगवेगळे शौचालय वापरा. जर रुग्णाने आपली खोली साफ केली तर ते चांगले आहे. मात्र, रुग्णाने वापरलेल्या गोष्टी वापरू नका. यामुळे आपल्याला आणि रुग्णाला कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -