घरलाईफस्टाईल'या' ५ टीप्स तुमच्या पोटावरील चरबी कमी करतील

‘या’ ५ टीप्स तुमच्या पोटावरील चरबी कमी करतील

Subscribe

पोटीवरील चरबी कमी करण्याकरता ५ महत्त्वाच्या टीप्स

सध्याच्या काळात अनेकांना बारीक व्हायचे असते. याकरता एनक डाएट आणि व्यायामाचा वापर देखील केला जातो. मात्र, काही केल्या ते काही कमी होत नाही. तर बऱ्याच जणी स्थूल नसतात पण, त्यांच्या वाढलेल्या पोटामुळे त्या जाडं दिसतात. मात्र, आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण अशा काही टीप्स आहे. ज्या तुम्ही आमलात आणात तर तुम्ही स्लिम आणि स्मार्ट दिसण्यास मदत होईल.

थोडं – थोडं खावे

- Advertisement -

बऱ्याचदा आपण दोन वेळा जेवतो. एक म्हणजे दुपारी आणि रात्री. मात्र, ही सवय सोडावी लागेल. आपला आहार ३ ते ४ भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकवेळी पोटभर न जेवता थोड्या थोड्या प्रमाणात जेवा. याने पोटही भरलेले राहील आणि पोटाचा घेरही कमी होण्यास मदत होईल.

गरम पाणी

- Advertisement -

पहाटे उठल्यावर गरम पाण्याचे सेवन करावे, ते फायदेशीर ठरेल. याने कॅलरीज कमी होतील. याव्यतिरिक्त जर आपण गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायला तर आणखीच चांगला परिणाम बघायला मिळेल.

मॉर्निंग वॉक

पहाटे पहाटे पायी चालणे, व्यायाम करणे, जॉगिंग करणे किंवा सायकलिंग करणे फायदेशीर ठरेल. यामुळे पोटातील चरबी कमी करण्यासाठी योग्य विकल्प आहे. याने हळुवार फॅट्स कमी होतील आणि पचनतंत्री सुरळीत होईल.

नौकासन

योगासनातील नौकासन हा एक उत्तम उपाय आहे. योगासने शारीरिक नव्हे तर मानसिक तक्रारी देखील दूर करतात. पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वात्तम आहे.

उशिरा जेवण करणे टाळा

बऱ्याचदा आपली जेवणाची योग्य वेळ नसते. दुपारी उशीरा जेवण झाले का सायंकाळचा नाश्ता उशीरा होतो आणि मग रात्रीचे जेवण उशीरा. पण, असे न करता रात्री लवकर जेवा. रात्री झोपण्याच्या दोन तासआधी आहार घ्या. या व्यतिरिक्त झोपण्याआधी शतपावली देखील करा. यामुळे जेवण जिरण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -