घरलाईफस्टाईलkitchen Tips: कोथिंबीर ताजी राहण्यासाठी वापरा या खास 'टीप्स'

kitchen Tips: कोथिंबीर ताजी राहण्यासाठी वापरा या खास ‘टीप्स’

Subscribe

डिश सजवायची असो की चटणी बनवायची असो कोथिंबीर हा त्यातला अविभाज्य घटक आहे. कोथिंबीरमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले व्हिटामीनही असते. यामुळे आपल्या देशात शाकाहाराबरोबरच मांसाहारी पदार्थातही कोथंबिर वापरली जाते. पण कोथिंबीर लवकर सुकत असल्याने ती कशी टीकवावी असा प्रश्न महिलांना पडतो. त्यासाठी आम्ही काही टिप्स सांगणार आहोत.

  • कोथिंबीर अधिक काळ ताजी राहावी यासाठी नेहमी टिश्यू पेपर व हवाबंद डब्याचा वापर करावा.
  • सर्वप्रथम कोथिंबीर दोन तीन वेळा पाण्यात धुवावी. त्यानंतर एका कागदावर ती ओली कोथिंबीर पसरून ठेवावी. पंख्याखाली किंवा सूर्यप्रकाशात त्यातील पाणी सुकेपर्यंत ती सुकवावी.
  • नंतर कोरडी झालेली कोथिंबीर एका टिश्यूपेपरमध्ये गुंडाळून ठेवावी.
  • त्यानंतर एका डब्यात टिश्यूपेपर पसरून घ्यावा. त्यात ही गुंडाळलेली कोथिंबीर आहे तशी ठेवावी.
  • डबा बंद करावा फ्रिजमध्ये ठेवावा. दोन आठवडे तरी ही हवाबंद कोथिंबीर ताजी राहते.
  • तसेच प्लास्टीकच्या पिशवीतही कोथिंबीर ताजी राहते.
  • पण त्यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावी.
  • पंख्याखाली किंवा सूर्यप्रकाशात सुकवून घ्यावी.
  • नंतर टिश्यूपेपरमध्ये गुंडाळून ती डब्यात ठेवावी. हा डबा फ्रिजमध्ये ठेवावा.
  • अशाच प्रकारे प्लास्टीकच्या पिशवीत कोथिंबीर ठेवून ती फ्रिजमध्ये ठेवावी.
  • कोथिंबीर फ्रिजमध्ये कधीही मोकळी ठेवू नये. लवकर सुकते. तर कधी कधी त्यात पाणी राहील्यास सडते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -