घरलाईफस्टाईलह्रदयविकारापासून वाचायचं आहे, तर सोडा या सवयी

ह्रदयविकारापासून वाचायचं आहे, तर सोडा या सवयी

Subscribe

रोज आपण असं काहीतरी काम करतो वा असं काहीतरी खातो ज्यामुळं आपल्या ह्रदयाला जास्त जपण्याची गरज असते. आपलं आयुष्य नीट राहावं यासाठी काही सवयी सोडणं गरजेचं आहे. काय आहेत या सवयी?

शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ह्रदय. ह्रदय बंद पडल्यास, संपूर्ण आयुष्य थांबतं. त्यामुळं सर्वात जास्त आपलं ह्रदय जपण्याची गरज असते. रोज आपण असं काहीतरी काम करतो वा असं काहीतरी खातो ज्यामुळं आपल्या ह्रदयाला जास्त जपण्याची गरज असते. आपलं आयुष्य नीट राहावं यासाठी काही सवयी सोडणं गरजेचं आहे. या सवयी सोडल्यास, आपण आपलं ह्रदय विकारांपासून वाचवू शकतो.

धुम्रपान – आयुष्यात लोक धुम्रपानाला खूप महत्त्व देतात आणि ही एक सवयच होऊन जाते. धुम्रपानामुळं ह्रदयविकार होण्याची जास्त संभावना असते. त्यामुळं अन्य विकार उद्भवण्याचीदेखील शक्यता असते. धुम्रपानमुळं ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. ही सवय सोडून देणे जास्त चांगलं आहे.

- Advertisement -

झोपेची कमतरता – ह्रदय कमकुवत होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे झोपेची कमतरता. शरीराला आवश्यक झोप न घेतल्यास, तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. कमी झोपेची सवय ही अत्यंत वाईट. झोप पूर्ण झाल्यामुळं आर्टरी ब्लॉक होण्याची शक्यता कमी होते. आर्टरी ब्लॉक ही अशी बाब आहे, ज्यामुळं ह्रदयाशी संबंधित विकारांची संभावना वाढते.

फास्ट फूड – फास्ट फूड ही सध्या बऱ्याच लोकांची सवय बनली आहे. जेवण म्हणून आता फास्ट फूडचा उपयोग लोक करू लागले आहेत. फास्ट फूडमध्ये जास्त प्रमाणात साखर आणि फॅट असतं, जे शरीरासाठी अतिशय हानिकारक असतं. त्यामुळं ही सवय कमी करण्याची गरज आहे.

- Advertisement -

दारू – दारूचं अधिक सेवन हे रक्तदाब वाढण्याचं महत्त्वाचं कारण आहे. तसंच ह्रदयाचा झटका येण्यासाठीदेखील दारू हे प्रमुख कारण आहे. दारू पिणं हे लोकांसाठी आता अगदी रोजची गोष्ट झाली आहे. युवा पिढी असो वा म्हातारे लोक सध्या सगळ्यांनाच दारूची सवय असल्याचं समोर येत आहे. वास्तविक सध्या बऱ्याच ठिकाणी शासनही दारूबंदी संदर्भात अभियान चालवत आहे. दारू पिण्याची सवय सोडून दिल्यास तुम्ही तुमचं ह्रदय वाचवू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -