घरलाईफस्टाईललिंबू झाले महाग म्हणून लोक पर्याय म्हणून लिंबाच्या जागी लावणार लसूण; पाहा...

लिंबू झाले महाग म्हणून लोक पर्याय म्हणून लिंबाच्या जागी लावणार लसूण; पाहा व्हायरल फोटो

Subscribe

ऐन उन्हाळ्यात महागाईने लिंबा सारख्या लहान गोष्टीचा भाव वाढवून मध्यमवर्गीय लोकांची चांगलीच पंचायत केली आहे. खरंतर उन्हाळ्यात अनेकजण लिंबू सरबत पिण्यास पसंती देतात, परंतु लिंबाची वाढती किंमत पाहून लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे लोक हैराण झाले आहेत. प्रत्येक जण महागाईचे चटके सोसत आहेत. आतापर्यंत फक्त पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत होते. मात्र आता ऐन उन्हाळ्यात महागाईने लिंबासारख्या लहान गोष्टीचा भाव वाढवून मध्यमवर्गीय लोकांची चांगलीच पंचायत केली आहे. खरं तर उन्हाळ्यात अनेक जण लिंबू सरबत पिण्यास पसंती देतात, परंतु लिंबाची वाढती किंमत पाहून लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लिंबाचा वाढलेला दर पाहून लोक आता सोशल मीडियावर अनेक मजेदार जोक्स आणि मीम्स बनवत आहेत. दरम्यान आता सोशल मीडियावर एक गमतीदार फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मिरचीबरोबर लिंबू ऐवजी लसूण लटकवलेला आहे. हा फोटो पाहून तुमच्याही लक्षात येईल की, लोक वाईट नजर लागू नये म्हणून मिरची सोबत लिंबू लटकवतात, परंतु आता लिंबू महाग झाल्यामुळे लोक लिंबू खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे आता लिंबा ऐवजी लसूण लावण्याची वेळ येईल की काय, असे विनोद केले जात आहेत.

- Advertisement -

सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या या फोटोला आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोसोबतच त्यांनी एक गमतीदार कॅप्शनसुद्धा दिले आहे. त्यात ते म्हणाले की, लिंबाच्या अनुपस्ठित पर्याय म्हणून लसूण लावण्यात आला आहे. लसणाने आज लिंबाचे काम पूर्ण केले. या पोस्टवर लोक भरभरून कमेंट करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा :आलिया आणि रणबीरने लग्नात घेतले ७ ऐवजी फक्त ४ फेरे ; आलियाच्या भावाने केला खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -