घरलाईफस्टाईलचला खेळ खेळूया

चला खेळ खेळूया

Subscribe

माहिती तंत्रज्ञानातील विकासामुळे आपल्या हाती स्मार्ट फोन,व्हिडिओ गेम्स आले. त्यामुळे मानवाची प्रगती तर झाली; पण आयुष्यमान मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे. माणसाने बुद्धीच्या जोरावर अनेक उपकरणांचा शोध लावला. पण तीच उपकरणे आज माणसाची बुध्दिभ्रष्ट होण्यास कारणीभूत ठरत आहेत. जीवनात खेळालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. लंगडी, खो-खो, सारीपाट, बुद्धीबळ सारखे मैदानी बैठे खेळ खेळण्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे.

शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच सामाजिक जडणघडणीत खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचप्रमाणे खेळामुळे व्यक्तीच्या सुप्त गुणांना चालना मिळून व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. सर्वसाधारणपणे दोन प्रकारचे खेळ असतात. मैदानी खेळ व बैठे खेळ. अभ्यास तसेच इतर कामांमुळे आलेला थकवा, ताण कमी करण्यासाठी दिवसातून 1 तास खेळ खेळणे महत्त्वाचे आहे. सांघिक खेळ खेळल्याने संघ भावना वाढीस लागते. तसेच नेतृत्व गुण विकसित होण्यासही सांघिक खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात. आयुष्यातील जय-पराजय दोन्हीही महत्त्वाचे असल्याची शिकवण आपण खेळांद्वारे प्राप्त करतो. आत्मविश्वासाने संकटांना सामोरे जाण्याचे बळ आपल्याला खेळांद्वारे मिळते. खेळांद्वारे बुद्धीचा विकास तर होतोच शिवाय चालण्या बोलण्यात सुसूत्रता, नियोजनबद्धता तसेच चांगल्या वाईटाची पारख करण्याचे गुण खेळांमुळे वाढीस लागतात. खेळात वापरण्यात येणार्‍या विविध डावपेचांमुळे बुद्धीचा विकास होतोच. शिवाय एकाग्रता वाढीस लागण्यास मदत होते. त्याचप्रमाणे दुसर्‍याला मदत करण्याची वृत्तीदेखील खेळामुळे विकसित होते.

- Advertisement -

खेळांचे मुख्यत्त्वेकरून दोन प्रकार पडतात. मैदानी खेळ आणि बैठे खेळ. खो-खो, लंगडी, क्रिकेट, हॉकी सारखे खेळ मैदानी प्रकारात मोडतात. तर बुद्धीबळ, कॅरम सारख्या खेळांचा बैठे प्रकारात समावेश होतो. आज परंपरेने चालत आलेले ग्रामीण खेळ हद्दपार होत आहेत. त्यामुळे मल्लखांब, कबड्डी, खो-खो, सूरपाट्या, विटीदांडू यांसारखे विविध ग्रामीण खेळ दिवसेंदिवस नामशेष होण्याची भीती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -