घरमुंबईभातसा धरणातील पाणी ठरणार वरदान

भातसा धरणातील पाणी ठरणार वरदान

Subscribe

108 गावांना होणार सिंचन

जलसंपदा विभागाकडून भातसा धरणाला जोडलेल्या उजव्यातीर कालव्यातून शेतकर्‍यांना भाजीपाला लागवडीसाठी सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. या पाण्याचा फायदा शहापूर व भिवंडी या मुख्यत दोन तालुक्यांतील शेतकर्‍यांना होणार आहे.

दरवर्षी भातस उजव्या कालव्यातून उन्हाळी भातशेती व भाजीपाला लागवडीसाठी शेतकर्‍यांना कालव्यातून जलसंपदा विभागाकडून पाणी दिले जाते. एकूण 67 किलोमीटर लांबीपर्यंत भातसा उजवा कालवा जोडलेला आहे.

- Advertisement -

भातसा उजव्या तीर कालव्याच्या पाण्याचा फायदा शहापूर व भिवंडी तालुक्यातील 108 गावातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी होतो. भातसा धरणाच्या मुख्य विमोचकातून एकूण 150 क्युसेसने उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आल्याची माहिती भातसा कालव्याचे उपअभियंता आनंद उदमले यांनी दिली.

दरवर्षी डिसेंबर अखेरीला हे पाणी सिंचनासाठी दिले जाते. कालव्याच्या सोडल्या जाणार्‍या पाण्यावर ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी उन्हाळी भातशेती करतात. तर काही शेतकरी मोठ्या प्रमाणावर भेंडी, वांगी, शिरोळे, घोसाळी, गवार, दुधी, कारली, शिमला मिरची, चवळी, काकडी, मेथी, पालक अशा पालेभाज्यांची लागवड करतात. या पाण्यावर कडधान्यांची लागवडही केली जाते. हा भाजीपाला शहापूर बाजारपेठेसह कल्याण, डोंबिवली, ठाणे येथील भाजी मंडयात नेला जातो. भाजीपाल्याच्या याा जोड व्यवसायातून शेतकर्‍यांना रोजगार मिळतो. त्यामुळे कालव्यातील पाणी शेतकर्‍यांना वरदान ठरत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -