नाश्त्यासाठी बनवा खमंग गव्हाचे डोसे

आपल्या दैनंदिन चविष्ट आहारासोबतच पौष्टिक आहार देखील महत्वाचा असतो. अशावेळी वारंवार आहारात नवनवीन पदार्थांचा सहभाग करा.

गव्हाच्या पिठाचे डोसे साहित्य :

 • 1 वाटी कणिक
 • 2 चमचे रवा
 • 1 मध्यम कांदा
 • 2 ते 3 हिरव्या मिरच्या
 • जिरे , मोहरी
 • कढीपत्ता 5 ते 6 पाने
 • मीठ चवीप्रमाणे
 • तेल आवश्यकतेनुसार

कृती :

 • सर्वप्रथम गव्हाचे पिठ आणि रवा एकत्र करून त्यात पाणी, मीठ घालून भिजवून घ्या. हे मिश्रण 10 मिनीटांसाठी बाजूला ठेवा. म्हणजे रवा चांगला फुलेल.
 • दुसरीकडे कढईत 2 चमचे तेल गरम करून घ्या.
 • आता त्यात मोहरी, जिरे, कांदा, मिरची, कढीपत्ता घालून परतून घ्या. परतलेले हे मिश्रण कणिक आणि रव्याच्या भिजवलेल्या पिठात घालून सर्व मिश्रण एकजीव करा.
 • हे मिश्रण पातळ ठेवा, म्हणजे डोसे कुरकुरीत होतील.
 • मग फ्राईंग पॅनला तेल लावून ते गरम करून घ्या.
 • गरम पॅनमध्ये आधी बाजूने आणि मग मध्ये मिश्रण घाला. एक बाजू चांगली खरपूस भाजल्यावर दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्या.
 • अतिशय कुरकुरीत डोसे तयार होतात.
 • आता गरमागरम डोसे सर्वांना सर्व्ह करा.

हेही वाचा :Receipe : श्रावणी सोमवारच्या उपवासात खा पौष्टिक मखाना बर्फी; जाणून घ्या साहित्य आणि कृती