घरलाईफस्टाईलनवीन वर्षाच्या स्वागतासाठी असे खुलवा सौंदर्य

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी असे खुलवा सौंदर्य

Subscribe

असे खुलवा सौंदर्य

२०१९ वर्ष सरायला अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे नवे वर्ष आता उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. तुमच्या सोशल मीडिया ग्रुप्सवर आतापासूनच आमंत्रणांचा पाऊस पडला असेल आणि मेकअप, ड्रेस आणि अॅक्सेसरीजसंदर्भात नियोजन सुरू असेल. या जोशपूर्ण वातावरणाची हवा तुम्हालाही लागली असेलच. यासाठी तुमची त्वचा या येऊ घातलेल्या पार्टी सीझनसाठी तयार करणे आवश्यक आहे, जेणेकरून नवीन वर्षाचे स्वागत तुम्ही तुमच्या उजळणाऱ्या त्वचेसह करू शकाल. डिसेंबर अखेरीस थंडीचा जोर वाढला असेल आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना कोरडी आणि भेगा पडलेली त्वचा, गुंता झालेले केस, असा तुमचा अवतार नसावा, असेच तुम्हाला वाटत असेल ना. संगीताच्या तालावर थिरकताना येणाऱ्या घामामुळे तुमचा मेकअप धुवून जाऊ नये, यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स येथे देत आहोत. त्यांचा उपयोग केल्यावर तुम्ही पार्टीच्या सुरुवातील जेवढ्या ताज्यातवान्या दिसत होतात, तेवढ्याच ताजतवान्या पार्टीच्या शेवटीही दिसू शकाल. यासाठी तुमच्या त्वचेची तयारी आजच सुरू करा.

तेलकट त्वचेकरता

- Advertisement -

तेलकट त्वचेसाठी तुम्ही सॅलिसिलिक अॅसिड वापरू शकता. सॅलिसिलिक अॅसिड्स डार्क स्पॉट्स (काळे डाग) काढून टाकते आणि त्वचा उजळवते. कोरड्या त्वचेसाठी ग्लायकॉलिक अॅसिड उपयुक्त असते आणि ते त्वचेवरील रेघा कमी करते. एक्सफोलिएशनमुळे टोनर आणि मॉइश्चरायझर अधिक चांगल्या प्रकारे काम करते.

त्वचेचे क्लिनिंग करा

- Advertisement -

त्वचा योग्य प्रकारे हायड्रेटेड असेल तर मेकअप लिबलिबित होत नाही किंवा त्याला भेगाही पडत नाहीत. तुम्ही दररोज त्वचेचे क्लिनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग केले तर तुमच्या मेकअपसाठी परफेक्ट बेस तयार होतो. जो नवीन वर्षाची पूर्वसंध्या संपेपर्यंत चांगल्या प्रकारे राहतो.

ओठांची काळजी

ओठांकडे दुर्लक्ष करू नका. तुमचे ओठही रोज एक्सफोलिएट करा आणि व्हिटॅमिन ई युक्त लिप बाम दररोज लावा जेणेकरून ओठ मऊ राहतील आणि पाउट करतानाही ओठांवर पोपडे पडणार नाहीत आणि ओठांचा रंगही दीर्घकाळ चांगला राहील.

तुम्ही मेकअप चढविण्यापूर्वी ही काळजी घ्या

  • वापरलेल्या आणि थंड टीबॅग्ज किंवा काकडीचे काप डोळ्यांवर ठेवा जेणेकरून ते ताजेतवाने होतील आणि डार्क सर्कल्स येण्याचे प्रमाण कमी होईल.
  • गुलाब पाणी, मध आणि कोरड्या मिल्क पावडरचा मास्क तयार करा आणि तो चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी तो काढून टाका. तुमचा चेहरा हलक्या हाताने चोळा. त्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होईल आणि उजळेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -