घरलाईफस्टाईलमूग डाळ कचोरी

मूग डाळ कचोरी

Subscribe

गरमागरम कचोरीची रेसिपी

अनेकांना गरमागरम कचोरी खाण्यास आवडते. पण, प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. बऱ्याच जणांना तिखट तर कोणाला गोड कचोरी खाण्यास आवडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मूग डाळ कचोरी रेसिपी दाखवणार आहोत. जी तुम्हाला नक्की आवडेल.

साहित्य

सारण करण्यासाठी

- Advertisement -
  • १/२ कप मूग डाळ
  • १/२ चमचा तूप
  • १/४ चमचा हळद
  • १/२ चमचा लालतिखट
  • १/२ चमचा जिरेपूड
  • १/२ चमचा सुंठ पावडर
  • १ चमचा धणेपूड
  • १ चमचा बडीशेपपूड
  • १ चमचा आमचूर पावडर
  • चवीनुसार मीठ
  • आवरण
  • २ कप मैदा
  • १/२ कप पाणी
  • तूप किंवा तेल
  • मीठ
  • तेल तळण्यासाठी

कृती

प्रथम बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये तूप आणि चवीनुसार मीठ घालावे. पीठ मळून घ्यावे. त्यानंतर, थोडे पाणी मिसळून पुन्हा पीठ मळून घ्यावे. पीठ फार घट्ट किंवा फार मऊ देखील मळू नये. आता हे पीठ ओलसर कापडाखाली झाकून ठेवावे.

- Advertisement -

त्यांनतर, कचोरीच्या आतील सारणाची तयारी करण्यास घ्यावी. दोन तास भिजवलेली मूगडाळ मिक्सरमध्ये हलकीशी बारीक करावी. आता, गरम पॅनमध्ये तूप घालून ते छान तापल्यावर त्यामध्ये हळद, लालतिखट, जिरेपूड, धणेपूड, बडीशेप पूड, आमचूर पावडर घालून सर्व जिन्नस छान परतून घ्यावीत. त्यानंतर, त्यामध्ये वाटलेली मूग डाळ, चवीला मीठ आणि थोडा हिंग घालून पुन्हा एकदा जिन्नस मंद आचेवर परतून घ्यावा. तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करावेत आणि ओलसर कपड्याखाली झाकून ठेवलेल्या मिश्रणाची हातानाचे लहान पुरी तयार करुन त्यामध्ये सारणची गोळी भरावी. आवरण नीट बंद करावे आणि हाताने हलकेच दाबावे. अशाप्रकारे, तयार झालेल्या कचोरी गरमागरम तेलात खुसखुशीत तळून घ्यावेत आणि आवडत्या चटणीसोबत सर्व्ह कराव्यात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -