घरलाईफस्टाईलउसण भरल्यास करा 'हे' उपाय

उसण भरल्यास करा ‘हे’ उपाय

Subscribe

उसण भरल्यास काय करावे?

बऱ्याचदा दैनंदिन कामकाज करत असताना जड वस्तू किंवा अनेकदा ओझे उचल्यामुळे अथवा चुकीच्या काही सवयींमुळे उसण भरण्याची समस्या फेडसावते. अशावेळी आयुर्वेदातील काही औषधांच्या सहाय्याने या वेदनांपासून आराम मिळवता येतो.

  • उसण भरल्यास सिंहनाद गुग्गुळ अगर गोक्षुरादि गुग्गुळ, सकाळ – संध्याकाळ ३/३ गोळ्या घ्याव्यात.
  • वारंवार उसण भरत असल्यास आणि बिब्ब्याची Allergie नसल्यास बिब्ब्याचे तेल लावावे. यामुळे आराम मिळतो.
  • पोटात सौभाग्य सुंठ आणि एरंडेलाची चपाती खावी. यामुळे उसण कमी होते.
  • दीर्घकालीन उसण भरल्यास उसण भरलेल्या ठिकाणी दाट गरम लेप लावावा आणि कोणत्याही तेलाने अभ्यंग करुन शेकावे. यामुळे आराम पडतो.
  • उसण भरलेल्या ठिकाणी गवती चहाचा अर्क लावावा. यामुळे दुखणे कमी होण्यास मदत होते.
  • स्नायूचा विकार आहे हे समजून सोपा व्यायाम करावा.
  • झोपण्यास कठीण अंथरुण वापरावे. गादी, उशीचा वापर टाळावा.
  • उकळलेले गरम गरम पाणी प्यावे. यामुळे ढेकर येतो. त्यासोबतच घाम येतो आणि उसण कमी होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -