घरलाईफस्टाईलपर्स माझी नीटनेटकी

पर्स माझी नीटनेटकी

Subscribe

प्रत्येक ड्रेस, साडीवर वेगवेगळी पर्स वापरण्याचा महिलांना छंद असतो. अशात एका पर्समधील साहित्य दुसर्‍या पर्समध्ये ठेवायचे असेल किंवा काही शोधायचे असेल तर कठीण जाते. त्यामुळे काही गोष्टींवर लक्ष दिल्यास पर्सचा अधिक आणि सोयीचा वापर करता येऊ शकते.

पर्समध्ये बनवा कप्पे-
पर्समध्ये नेहमी छोटे पाऊच किंवा महत्त्वाचे साहित्य ठेवा. जेणेकरून ते वेळेवर सापडतील. यासाठी पर्समध्ये वेगवेगळे कप्पे बनवा. पैसे, कॉस्मेटिक पाऊच, ओळखपत्र वेगळ्या कप्प्यात ठेवावे. त्यामुळे पर्स बदलतानाही वस्तू लवकर सापडतात.

- Advertisement -

आवश्यक वस्तू-
पर्समध्ये नेहमी महत्त्वाच्या आणि गरजेच्याच वस्तू ठेवाव्यात. छोटे छोटे साहित्य बॅगेत बर्‍याच दिवस पडून असतात. त्यामुळे पर्स, बॅग अस्ताव्यस्त होते. जड दागिने, टीश्यू पेपर, बिल यासारख्या वस्तू जास्त काळ पर्समध्ये ठेवू नयेत. नेहमी निवडक वस्तू ठेवाव्यात.

छायांकित प्रती ठेवा-
पर्समध्ये ओळखपत्राची रंगीत छायांकित प्रतच नेहमी ठेवावी. कारण पर्स हरवल्यास मूळ कागदपत्रे गहाळ होणार नाही. पर्समध्ये जेल, कॉस्मेटिक जेल ठेवू नये. कारण जेल पिघळून पर्स त्यातील वस्तू खराब होण्याचा धोका असतो.

- Advertisement -

मोबाइल, चाव्या-
अनेकदा पर्स, बॅगमध्ये महत्त्वाच्या वस्तू शोधाव्या लागतात. परंतु, वस्तू वेळेवर सापडल्या नाहीत तर पर्स झटकावी लागते. या समस्येवर मात करण्यासाठी मोबाइल, चाव्या यासारख्या महत्त्वाच्या वस्तू नेहमी बाहेरच्या पॉकेटमध्ये ठेवाव्या. सुटे पैसे वेगळे ठेवावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -