घरलाईफस्टाईलऑनलाईन शॉपिंग करताना राहा अलर्ट

ऑनलाईन शॉपिंग करताना राहा अलर्ट

Subscribe

दिवाळसण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण शॉपिंग मूडमध्ये आहेत. पण गेल्या काही वर्षात दुकानात जाऊन खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल बदलला असून वेळेचा अभाव आणि दुकानातील गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग ग्राहकांना सोयीस्कर वाटू लागली आहे. त्यामुळे ब्रँडेड कंपन्याच्या कपडे, वस्तूंवर ऑफर्स, डिस्काऊंट देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांच्या वेबसाईट, अॅप्स सर्च केले जात आहेत. पण ऑनलाईन शॉपिंग जरी सोयीस्कर वाटत असली तरी उत्साहाच्या भरात त्यातील धोक्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये. यासाठीच ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टींची काळजी घेणेही गरजेचे आहे.

कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय
ऑनलाईन शॉपिंग करताना नेहमी आपले बँक अकाऊंट सेफ ठेवण्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडावा. त्यामुळे तुमच्या बँकेची माहिती देण्याची गरज लागत नाही. ऑर्डर आल्यावरच कॅश पेमेंट करावे.

- Advertisement -

एटीएम डिटेल्स
ऑनलाईन शॉपिंग करताना पेमेंट करतेवेळी एटीएम कार्डची डिटेल्स कधीही सेव करू नये. कारण तसे करणे असुरक्षित आहे. त्यामुळे तुमच्या बँक डिटेल्स हॅकर्स हॅक करू शकतात.

वेबसाईटची युआरएल
तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर हॅकर्सचीही नजर असते. बनावट शॉपिंग वेबसाईट, अॅप बनवून हॅकर्स तुम्हाला जाळ्यात ओढू शकतात. यामुळे डिस्काऊंट, ऑफर्सला न भुलता तुम्ही ज्या वेबसाईट किंवा अॅपवरून खरेदी करत आहात ती अधिकृत आहे का हे आधी तपासावे. त्यासाठी वेबसाईटची युआरएल क्रॉस चेक करावी. युआरएलची सुरुवात https वरुन असणे गरजेचे आहे. बनावट वेबसाईटची युआरएल http अशी असते. हा फरक तपासूनच ऑनलाईन शॉपिंग केल्यास पश्चातापाची वेळ येणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा- धनतेरसला चांदीची नाणी, ज्वेलरी खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -