घरलाईफस्टाईलहे आहेत आयुष्यातील चुकीचे निर्णय, ज्यांची किंमत मोजावीच लागते

हे आहेत आयुष्यातील चुकीचे निर्णय, ज्यांची किंमत मोजावीच लागते

Subscribe

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे पश्चातापाला सामोरे जावे लागते. व्यक्ती श्रीमंत असो गरीब किंवा अतिहुशार पण कधी ना कधी त्यांच्याकडूनही चुकीचा निर्णय घेतला जातो. साधारणत व्यक्तीकडून भावनेच्या भरात किंवा रागाच्या भरातच असे ७ निर्णय घेतले जातात ज्याची किंमत त्याला आयुष्यभर मोजावी लागते. यामुळे कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेताना नेहमी विचार करणे गरजेचे असते.

तब्येतीची हेळसांड
आपल्यापैकी बरेच जण आजारी पडेपर्यंत तब्येतीची काळजी घेत नाहीत. खाण पिणं व्यवस्थित असेल तर काही होत नाही या भ्रमात ते राहतात. पण नंतर तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या की मग फिटनेससाठी धावाधाव करतात.

- Advertisement -

मित्र मंडळीपासून लांब राहणे

सध्याच्या धकाधकीच्या आणि तणावमुक्त वातावरणात प्रत्येकजण तणावात जगत आहे. यामुळे मित्रांशी बोलणे मन मोकळे करणे आवश्यक आहे. यामुळे ताण कमी तर होतोच तसेच चर्चेतून अनेक प्रश्नांची उत्तरेही मिळतात.

- Advertisement -

नातेसंबंध जपणे
बऱ्याचवेळा समजूतदारपणाचा अभाव असल्याने नातेसंबंधात दुरावा येतो. तो वेळीच दूर केला नाही तर नाते तुटते. अहंकारामुळनंतर पश्चाताप करण्याची वेळ येते.

आर्थिक बचतीकडे दुर्लक्ष
जगण्यासाठी पैसा लागतो हे खरे आहे. त्यासाठी सुरुवातीपासूनच पैशांची बचत करणे आवश्यक आहे. बरेचजण पैशांच्या बचतीकडे गांभीर्याने पाहात नाहीत. यामुळे पुढे पश्चातापाची वेळ येते.

निर्णय न घेता येणे
आपल्यापैकी बऱ्याचजणांमध्ये निर्णय क्षमता नसते. आत्मविश्वासाच्या अभावामुळे अशा व्यक्ती निर्णय घेण्यास, असमर्थ असतात. पण त्यामुळे त्यांचे प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये नुकसान होते. पुढे जरी त्याचा पश्चाताप होत असला तरी तोपर्यत वेळही निघून गेलेली असते.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -