घरलाईफस्टाईलजेवताना हसू आणि बोलू नका,मोबाईल बघू नका, का ते वाचा

जेवताना हसू आणि बोलू नका,मोबाईल बघू नका, का ते वाचा

Subscribe

आयुर्वेदात भोजन म्हणजेच आहारासाठी आठ नियम सांगण्यात आले आहेत. हे आठ नियम फॉलो केले तर त्याचा भोजनाचे सर्वाधिक लाभ मिळू शकतात. म्हणजेच तुम्ही कसे आणि कोणत्या प्रकारे आहार घेतला पाहिजे. त्याचसोबत हाताने जेवल्याने होणारे फायदे ही सांगितले गेले आहेत. त्यामुळे जेवताना कोणत्या चुका करणे टाळले पाहिजेत याच बद्दल पाहूयात.

-जेवताना एकमेकांशी बोलू नका. काही वेळेस असे होते की, तुम्ही खात असलेले जेवण तुमच्या अन्ननलिकेत अडकल्यास तुम्हाला ठसका लागू शकतो. अशातच डोळ्यातून ही पाणी येऊ शकते. काही वेळेस ठसका लागल्यानंतर खोकताना उलटी सुद्धा होऊ शकते.

- Advertisement -

-भोजन व्यवस्थितीत चावून खा. अन्न चावून न खाणे आणि गिळणे आरोग्यासाठी उत्तम मानले जात नाही. जेवताना जर तुम्ही ते व्यवस्थितीत चावून खाल्ल्यास तर लाळेत असलेले एंजाइम जेवण पचवण्यास मदत करतात. मात्र न चावता जेवण खाल्ल्यास तर पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

- Advertisement -

-काही लोक टीव्ही पाहत, झोपून जेवतात. तर बुफेट जेवणावेळी उभं राहून जेवले जाते. मात्र जेवण नेहमीच बसून जेवले पाहिजे. झोपून किंवा उभं राहून जेवल्याने गॅस, कब्ज, सांधेदुखीची तक्रार निर्माण होऊ शकते. ऐवढेच नव्हे तर काही संशोधनातून असे समोर आले आहे की, उभं राहून जेवल्याने पुरुषांमध्ये वंधत्वाचा धोका वाढू शकतो.

-जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. जर तुम्हाला जेवताना पाणी पिण्याची सवय असेल तर ती बदला. कारण असे केल्याने पचनक्रिया कमजोर होऊ शकते.

-जेवल्यानंतर लगेच झोपू नये. खाल्ल्यानंतर लगेच झोपल्यास जेवलेले अन्नपदार्थ व्यवस्थितीत पचले जात नाहीत. त्यामुळे पोटात जळजळ, अपचनाची समस्या उद्भवू शकते.


हेही वाचा- लंचमध्ये चुकूनही खाऊ नयेत हे पदार्थ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -