घरनवरात्रौत्सव 2022नवरात्रीच्या उपवासाला 'अरबी कोफ्ते' नक्की ट्राय करा

नवरात्रीच्या उपवासाला ‘अरबी कोफ्ते’ नक्की ट्राय करा

Subscribe

उपवासाचा अरबी कोफ्ता असं या रेसिपीचं नाव आहे. हा पदार्थ खूप पौष्टिक सुद्धा आहे त्याच सोबत बनविण्यासाठी सुद्धा खुप सोपा आहे.

काहीच दिवसात नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. देवीच्या स्वागताची तयारी सुद्धा खुप उत्साहात सुरु आहे. नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करण्याची परंपरा भारतात आहे. काही जण नऊ दिवस उपवास करतात तर काही जण पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात. नवरात्रीच्या या नऊ दिवसात उपवासासाठी रोज कोणते नवे पदार्थ बनवायचे हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. पण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आमच्या कडे आहे.

हा ही वाचा –  भारतातील ‘ही’ 5 पर्यंटनस्थळं आहेत महिलांसाठी सुरक्षित

- Advertisement -

उपवास म्हटलं की साबुदाणे किंवा बटाट्याचे पदार्थ हमखास बनविले जातात. पण सारखे सारखे तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी एक नवा उपवासाचा पदार्थ नक्की ट्राय करा. एक खास रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. उपवासाचा अरबी कोफ्ता असं या रेसिपीचं नाव आहे. हा पदार्थ खूप पौष्टिक सुद्धा आहे त्याच सोबत बनविण्यासाठी सुद्धा खुप सोपा आहे. अरबी म्हणेज अळूची बोंडं. हा एक कंदमुळाचा प्रकार आहे. अळूच्या बोंडाची भाजी अरबीची भाजी म्हणूनसुद्धा ओळखली जाते. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

हे ही वाचा – नवरात्रीमध्ये कांदा आणि लसूण न खाण्यामागे काय आहे आर्युर्वेदिक आणि वैज्ञानिक कारण

- Advertisement -

अरबी कोफ्ता बनविण्यासाठी लागणारे साहित्य

अरबी (अळुची बोंडं) 250 ग्रॅम

हिरव्ही मिरची 1

गव्हाचे पीठ 3 चमचे

आलं अर्धा इंच

ओवा 1 चमचा

सैंधव मीठ चवीनुसार

टाळण्यासाठी तेल

अरबी कोफ्ता बनविण्याची कृती 

कोफ्ते बनवण्यासाठी आधी अरबी उकडून त्याची साल काढून घ्यावी

त्यानंतर त्यात गव्हाचे पीठ,आलं, हिरवी मिरची, ओवा आणि सैंधव मीठ घालून ते मिश्रण चांगले एकजीव करून घ्या

हाताला तेल लावून तयार केलेल्या मिश्रणाचे लहान किंवा मोठ्या आकाराचे गोळे बनवून घ्या. किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कोफ्त्यांना आकार द्या

कढईत तेल गरम करून सोनेरी रंग येईपर्यंत कोफ्ते टाळून घ्या

हे कोफ्ते तुम्ही दही, पुदिना आणि काकडीच्या चटणी सोबत खाऊ शकता.

हे ही वाचा – व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जावं की पार्कमध्ये जावं? या टिप्स नक्की वाचा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -