घरलाईफस्टाईलनवरात्रीमध्ये कांदा आणि लसूण न खाण्यामागे काय आहे आर्युर्वेदिक आणि वैज्ञानिक कारण

नवरात्रीमध्ये कांदा आणि लसूण न खाण्यामागे काय आहे आर्युर्वेदिक आणि वैज्ञानिक कारण

Subscribe

कांदा आणि लसणाला तामसिक प्रकृतीचे मानले जाते आणि म्हटलं जातं की, हे शरीरामध्ये मानसिक आणि भावनात्मक ऊर्जा वाढवतात ज्यामुळे मानसाचे मन भटकते.

शारदीय नवरात्र लवकरच सुरू होणार आहे. ही नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. दरम्यान, नवरात्रीच्या काळात अनेक नियम पाळले जातात.

नवरात्रीमध्ये कांदा आणि लसूण का खात नाहीत?
हिंदू धर्मामध्ये अनेक कुटुंबांमध्ये नवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण खात नाहीत. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या काळात मासांहार आणि कांदा, लसूण या तामसिक पदार्थांचे सेवन केले जात नाही.

- Advertisement -

जाणून घ्या आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक कारण
आयुर्वेदानुसार, खाद्य पदार्थांना त्यांच्या प्रकृती आणि खाल्ल्यानंतर शरीरामध्ये होणाऱ्या प्रतिक्रियांच्या आधारे तीन विविध श्रेणीमध्ये वाटलं जातं.

  1. राजसिक आहार
  2. तामसिक आहार
  3. सात्विक आहार
  • व्रताच्या काळात लोक सात्विक आहार खाणं पसंत करतात परंतु यामागे धार्मिक मान्यतेव्यतिरिक्त एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. शारदीय नवरात्र ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या काळात असते. या काळात ऋतू शरद ऋतूपासून हिवाळ्यात बदलतो. या बदलत्या हवामानामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागले. अशा स्थितीत या ऋतूत सात्विक अन्न खाणं शरीरासाठी जास्त उपयुक्त असतं.
  • विज्ञानाच्या मते, कांदा आणि लसणाला तामसिक प्रकृतीचे मानले जाते आणि म्हटलं जातं की, हे शरीरामध्ये मानसिक आणि भावनात्मक ऊर्जा वाढवतात ज्यामुळे मानसाचे मन भटकते. असं म्हटलं जात की, कांदा आणि लसणाच्या जास्त वापर केल्याने मानसाचा धार्मिक गोष्टीत रस कमी होतो. पुराणांमध्ये कांदा आणि लसणाला राजसिक आणि तामसिक मानले जाते. असं म्हटलं जातं की, तामसिक आणि राजसिक गुण वाढल्यास मानसाचे अज्ञान कमी होते. त्यामुळे नेहमीच सात्विक आहार करण्याचे सल्ले दिले जातात.
  • तामसिक पदार्थांमध्ये मांस-मच्छी, कांदा, लसूण यांना राक्षस प्रवृत्तीचे अन्न मानले जाते. यांच्या सेवनाने घरामध्ये अशांति, रोग आणि चिंता घरामध्ये प्रवेश करते.

हेही वाचा :

नवरात्रीमध्ये कांदा, लसूण का खात नाहीत? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -