घरक्रीडा'मी पण माणूस आहे...'; राग येण्याबाबत धोनीने सांगितला किस्सा

‘मी पण माणूस आहे…’; राग येण्याबाबत धोनीने सांगितला किस्सा

Subscribe

क्रिकेटच्या सामन्यात बऱ्याचदा खेळाडू आपाआपसात भांडताना आणि खेळाडूने चूक केल्यास कर्णधार त्यांच्यावर ओरडताना पाहायला मिळते. अनेकदा सामना मोक्याच्या क्षणी हातातून निसटल्यास कर्णधाराचा खेळाडूवरील राग अनावर होतो आणि तो संबंधित खेळाडूवर रागवतो.

क्रिकेटच्या सामन्यात बऱ्याचदा खेळाडू आपाआपसात भांडताना आणि खेळाडूने चूक केल्यास कर्णधार त्यांच्यावर ओरडताना पाहायला मिळते. अनेकदा सामना मोक्याच्या क्षणी हातातून निसटल्यास कर्णधाराचा खेळाडूवरील राग अनावर होतो आणि तो संबंधित खेळाडूवर रागवतो. याच क्रिकेट सामन्यातील रागाबाबत भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनी याने भाष्य केले आहे. “मी पण माणूस आहे. आतून मलाही तुम्हा सर्वांसारखेच वाटते. जेव्हा तुम्ही एकमेकांशी सामने खेळता तेव्हा तुम्हाला वाईट वाटते”, असे धोनीने म्हटले. (Indian Former Cricketer MS Dhoni angry MS Dhoni reveals on the field)

“मी पण माणूस आहे. मलाही आतून तुम्हा सर्वांसारखेच वाटते. जेव्हा तुम्ही एकमेकांशी सामने खेळता तेव्हा तुम्हाला वाईट वाटते. आम्ही आमच्या देशाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आम्हाला वाईट वाटते पण आम्ही आमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो”, असे महेंद्र सिंग धोनी यानी म्हटले.

- Advertisement -

याशिवाय, “खेळाडू मैदानावर 100 टक्के सतर्क असेल, त्यानंतरही त्याने झेल सोडला, तर मला काहीच अडचण नाही. साहजिकच त्याआधी सराव करताना त्याने किती झेल घेतले हे मला पाहायचे आहे. जर त्याला कुठेतरी अडचण असल्यास ती सुधारण्यासाठी प्रयत्न करत असेल. मी झेल सोडण्याऐवजी या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. त्या झेलमुळे आम्ही सामना गमावला असेल पण प्रयत्न नेहमी त्याच्या स्थितीत राहण्याचा आणि गोष्टी समजून घेण्याचा असतो”, असेही धोनी म्हणाला.

दरम्यान, 2007 साली झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या विजयात महेंद्र सिंग धोनीचा महत्वाचा वाटा होता. कर्णधार असताना धोनीने योग्य निर्णय घेत विश्वचषक भारताला मिळवून दिला. त्यानंतर 2011 साली झालेल्या विश्वतचषकात महेंद्र सिंग धोनीने विजयी षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला होता. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीनं संघाला दबावाच्या परिस्थितीतून बाहेर काढले आणि नाबाद राहताना संघाला विजयापर्यंत नेले.

- Advertisement -

हेही वाचा – नागपुरात आज होणाऱ्या भारत-ऑस्टेलिया टी-२० सामन्यावर पावसाचे सावट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -