घरलोकसभा २०१९दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ?

दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ?

Subscribe

उत्तरप्रदेशात ध्रुवीकरणाचे राजकारण

भारताच्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेश हे राज्य सर्वात महत्वाचे राज्य आहे. एकूण लोकसभा जागांपैकी सर्वाधिक 80 जागा या एकट्या मतदार संघात आहेत.तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच राज्यातील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.तर विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसकडून पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी(रायबरेली) आणि आताचे अध्यक्ष राहुल गांधी( अमेठी) याच राज्यातून निवडणुका लढवत आहेत.त्यामुळे देशाच्या राजकारणातील महत्त्वाच्या व्यक्तींमुळे सार्‍या देशाचे लक्ष या राज्याकडे लागून राहिले आहे.

या राज्यात आतापर्यंत चौथ्या टप्प्यांपर्यंतच्या निवडणुका पार पडल्या आहेत.आता 5 व्या,6 व्या आणि 7 व्या टप्प्यांतील 41 जागांसाठी मतदान बाकी आहे. 2014 साली जी मोदी लाट आली ती खर्‍या अर्थाने या राज्यात आली.कारण जवळपास एकूण मतांपैकी 42.30 टक्के मते भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि त्यांच्या 80 पैकी 71 जागा जिंकून आल्या होत्या. त्यामुळे भाजप मित्रपक्ष विरूद्ध अशी लढत या राज्यात पहायला मिळेल अशी शक्यता होती.परंतु, सपा-बसपाने काँग्रेसला बाजूला ठेवून आपला संसार थाटल्याने काँग्रेस एकटी पडली आहे.त्यामुळे आता या राज्यात सपा-बसपा,भाजप आणि काँग्रेस अशी लढत होणार आहे.

- Advertisement -

जे तीन पक्ष एकत्र येणार अशी शक्यता वर्तवली जात होती,तेच सपा आणि बसपा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत आहेत.मुस्लीम मत बँकेवर डोळा ठेवून जास्तीत जास्त मते आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न सपा -बसपा तसेच काँग्रेस करताना दिसत आहेत. मायावती आणि अखिलेश यादव यांच्याशिवाय राहुल आणि प्रियंका गांधी या लढ्यात उतरले आहेत. दोन्ही गट एकमेकांवर भाजपला फायदा करून देत असल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे मुस्लीम मतदारांमध्ये गोंधळाची स्थिती वाढली आहे.तर यांच्या भांडणामुळे 41 जागांवर आम्हाला फायदा झाल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

आमचे उमेदवार केवळ भाजपचे नुकसान करत आहेत,असे प्रियंका गांधी म्हणत आहेत.एका प्रकारे हा मुस्लीम मतांना आपल्या बाजूने करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सपा आणि बसपाकडून होणार्‍या आरोपांमुळे त्यांना ही सफाई द्यायची वेळ आली आहे. जिथे भाजपच्या उमेदवारांविरूद्ध जिंकून यायची शक्यता नाही,अशा उमेदवारांना काँग्रेसने उभे केले आहे,असा आरोप सपा आणि बसपाकडून करण्यात येत आहे.काँग्रेसच्या या अशा राजकारणामुळे भाजपपेक्षा सपा आणि बसपालाच याचा फटका बसणार आहे.तर काही ठिकाणी लढत सोपी झाल्याचे भाजपकडून बोलले जात आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यातील उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारावर दृष्टीक्षेप टाकला तर काँग्रेस आणि एसपी-बीएसपी भाजपऐवजी एकमेकांना लक्ष्य करीत आहेत. मायावती आणि अखिलेश यांच्यावर टीका करताना या दोघांवर घोटाळ्यांचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.तर काँग्रेस आणि भाजप एकच आहेत,असा प्रचार सपा आणि बसपाकडून केला जात आहे.भाजपशी जो पक्ष मुख्य लढतीत असेल त्याकडे मुस्लीम मतांची संख्या जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे ही मते आपल्याकडे खेचण्याचा दोन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये मतदान शिल्लक राहिलेल्या पश्चिम विभागातील बहुतेक मतदारसंघांमध्ये मुस्लीम मते महत्त्वपूर्ण आहेत. मध्य उत्तर प्रदेश, पूर्वांचल आणि बुंदेलखंडमधील निवडणुका अजूनही प्रलंबित आहेत. इथेही, बर्‍याच ठिकाणी मुस्लीम मतदारांची संख्या चांगली आहे. त्याच मत बँकेला आकर्षित करण्यासाठी, काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि एसपी-बीएसपी एकमेकांवर आरोप करत आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी सुरू झालेली ही दोन्ही पक्षांतील चढाओढ तिरंगी स्पर्धा वाटत असली तरी भाजपसाठीही एक मदत ठरू शकते.

2014 सालचे बलाबल
भाजप – 71 + अपना दल – २
समाजवादी पक्ष( तिसरी आघाडी) -5
काँग्रेस( युपीए)-2

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -