घरमहा @२८८विक्रोळी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १५६

विक्रोळी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १५६

Subscribe

विक्रोळी (विधानसभा क्र. १५६) हा मुंबई उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

शेजारीच असणाऱ्या डम्पिंग ग्राऊंड आणि अस्वच्छता यामुळे विक्रोळी मतदारसंघात आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. तसेच, ट्रान्झिट कॅम्पमधल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही कित्येक वर्षांपासून प्रलंबितच आहे. या मूलभूत समस्यांची मागणी एकीकडे असताना दुसरीकडे इथल्या मतदारांमध्ये दलित मतदारांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे उमेदवार निवडीमध्ये पक्षांकडून हा घटक नेहमीच विचारात घेतला जातो. २००९च्या राज ठाकरेंच्या सभांचा परिणाम म्हणून मनसेचे उमेदवार मंगेश सांगळे यांनी मोठा विजय मिळवला होता. मात्र, २०१४मध्ये मोदी लाटेसमोर त्यांचा तब्बल ३४ हजार मतांनी पराभव झाला. या मतदारसंघात एकूण २५२ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १५६

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,३६,९९२
महिला – १,१७,८३८

- Advertisement -

एकूण मतदार – २,५४,८३०


Sunil Raut
सुनील राऊत

विद्यमान आमदार – सुनील राऊत, शिवसेना

२०१४मध्ये पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून जाण्याआधी सुनील राऊत यांनी सामाजिक क्षेत्रात काम केलं होतं. मात्र, निवडणुकीच्या राजकारणात अनुभव नसताना देखील राऊत यांनी मनसेच्या मंगेश सांगळेंचा मोठा पराभव केला. भाजप-शिवसेना स्वतंत्र जरी लढले असले, तरी मोदी लाटेचा फायदा शिवसेनेला देखील झालाच. संजय राऊत यांचे बंधू असलेल्या सुनील राऊत यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकांवेळी किरीट सोमय्यांना उमेदवारी दिली, तर बंडखोरी करण्याचा इशारा दिला होता.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) सुनील राऊत, शिवसेना – ५०,३०२
२) मंगेश सांगळे, मनसे – २४,९६३
३) संजय दीना पाटील, राष्ट्रवादी – २०,२३३
४) संदेश म्हात्रे, काँग्रेस – १८,०४६
५) विवेक पंडित, रिपाइं – ६९७५

नोटा – ३२५१

मतदानाची टक्केवारी – ५१.६२ %


हेही वाचा – मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -