घरमहाराष्ट्र१७ ऑगस्टपासून भाजपची पुन्हा 'महाजनादेश' यात्रा

१७ ऑगस्टपासून भाजपची पुन्हा ‘महाजनादेश’ यात्रा

Subscribe

भाजपने महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केल्याने विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन आणि कोल्हापूर-सांगली येथील पूर परिस्थिती यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्थगित केलेल्या ‘महाजनादेश’ यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. विदर्भातून सुरू करण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अहमदनगर आणि मराठवाड्यात ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या टप्प्यात १८ जिल्ह्यांमधील ९३ विधानसभा मतदारसंघात ही यात्रा प्रवास करणार आहे.

हेही वाचा – ‘राज्यातील पूरपरिस्थितीचे संकुचित राजकारण करण्याचा प्रयत्न आहे’

असा असेल दुसरा टप्पा

१८ ऑगस्ट रोजी ‘महाजनादेश’ यात्रेचा दुसरा टप्पा अहमदनगरमधून सुरू होणार आहे. त्यानुसार १८ ऑगस्ट रोजी अकोले व संगमनेर येथे सभा होतील. त्यानंतर याच दिवशी राहुरी आणि नगर या ठिकाणी स्वागत समारंभ पार पडेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्ट रोजी पाथर्डी, आष्टी आणि जामखेड या ठिकाणी सभा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडकडे कूच करतील. दरम्यान पूर परिस्थितीमुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनही त्यांच्या यात्रा स्थगित करण्यात आल्या होत्या. पण त्यांच्या यात्रांचा पुढील टप्पा अद्याप घोषित करण्यात आलेला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरेंप्रमाणे राणेही म्हणाले, ‘निवडणूक पुढे ढकला’

विरोधक टीका करण्याची शक्यता

दरम्यान सांगली आणि कोल्हापूरमधील पूरस्थिती आटोक्यात येत आहे. शासकीय यंत्रणांसह स्वयंसेवी संस्थासुद्धा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंसह आरोग्यासाठी उपयुक्त वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. असे असले तरी येथील पूरग्रस्तांच्या पुनर्वसानाचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे या परिस्थितीतही भाजप ‘महाजनादेश’ यात्रेच्या पुढील टप्प्याचे नियोजन करत असल्याने विरोधकांकडून यावर टीका केली जाऊ शकते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -