घरमहाराष्ट्रनाशिकहरिश्चंद्र चव्हाणांचे लक्ष इगतपुरी, पेठ- दिंडोरीवर

हरिश्चंद्र चव्हाणांचे लक्ष इगतपुरी, पेठ- दिंडोरीवर

Subscribe

शस्त्रक्रियेनंतर सक्रिय; विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत तब्येतीच्या कारणास्तव दिल्ली येथे एम्स रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण चार महिन्यांनी पुन्हा नव्या जोमाने सक्रिय झाले आहेत. त्यांचे सक्रिय होणे ही विधानसभा निवडणुकीची तयारी असल्याचे मानले जात आहे. त्यांनी सध्या इगतपुरी आणि पेठ-दिंडोरी या दोन्ही मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचे सांगण्यात येते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने हरिश्चंद्र चव्हाण यांना थांबण्याचा सल्ला देऊन पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर चव्हाण हे राजकारणातून बाजूला झाल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली. याच दरम्यान, त्यांच्या जबड्याची दिल्लीतील एम्स रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते आता मतदारसंघातील विविध बैठका आणि कार्यक्रमांसाठी आवर्जुन उपस्थित राहत आहेत. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर किंंवा दिंडोरी-पेठ यापैकी एका आदिवासी विधानसभा मतदार संघातुनही ते निवडणूक लढवतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

जनतेसाठी मैदानात उतरू

आपण शस्त्रक्रियेनंतर ठणठणीत झालो आहोत. काही विरोधकांनी खोडसाळपणा करून आपण राजकारणातून बाजूला झाल्याचा प्रचार सुरू केला होता. त्यात तथ्य नाही. जिल्ह्यातील आदिवासी बांधव, विविध संघटना, कार्यकर्ते, संस्था सांगतील तेथून आपण जनतेसाठी मैदानात उतरू.– हरिश्चंद्र चव्हाण, माजी खासदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -