घरमहाराष्ट्रराज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत महाडचे दोन विद्यार्थी सन्मानित

राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत महाडचे दोन विद्यार्थी सन्मानित

Subscribe

मुक्ता वारंगे आणि अमेय जोशी यांचे यश

महाड येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या पा. म. थरवळ कन्या विद्यालयामध्ये इयत्ता 6 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुक्ता राहूल वारंगे या विद्यार्थिनीला राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक म्हणून नुकतेच सन्मानित करण्यात आले. मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत मुक्ताने यश मिळविले. त्याचप्रमाणे येथील परांजपे विद्या मंदिरातील अमेय शिवाजी यादव इयत्ता 6 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यालादेखील बाल वैज्ञानिक म्हणून सन्मानित करण्यात आले. वरील दोनही विद्यार्थ्याचे महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे सन 1981 पासुन डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा घेतली जात आहे. ही स्पर्धा चार टप्प्यांमध्ये घेण्यात येते. पहिला टप्पा लेखी परीक्षेचा असून दुसर्‍या टप्प्यात प्रात्यक्षिक सादरीकरण असते. तर तिसर्‍या टप्प्यामध्ये मुलाखत घेण्यात आल्या नंतर चौथ्या टप्प्यामध्ये प्रकल्प तयार करून त्याचे सादरीकरण करायचे असते. अतिशय कठीण तसेच बुध्दीची चाचणी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची बाल वैज्ञानिक म्हणून निवड केली जाते. या परीक्षेला या वर्षी संपूर्ण राज्यातून सुमारे 60 हजारपेक्षा अधिक विद्यार्थी बसले होते. यातून 510 विद्यार्थ्यांची बाल वैज्ञानिक म्हणून निवड करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -