घरमहाराष्ट्रपुणेPolitics : वळसे पाटलांच्या मतदारसंघात रोहित पवारांचे 'नवा दादा' नावाने बॅनर

Politics : वळसे पाटलांच्या मतदारसंघात रोहित पवारांचे ‘नवा दादा’ नावाने बॅनर

Subscribe

पुणे : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं आहे. त्यामुळे शरद पवार गट आणखीनच आक्रमक झाला आहे. अशातच आता अजित पवारांबरोबर गेलेल्या दिलीप वळसे पाटलांचा बालेकिल्ला असणाऱ्या आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सभा होणार आहे. या सभेनिमित्त लावण्यात आलेल्या आमदार रोहित पवार यांच्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. खरं तर या बॅनरच्या माध्यमातून अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. (Maharashtra Politics Rohit Pawars banner with the name Nava Dada in Dilip Valse Patil constituency)

हेही वाचा – Uddhav Thackeray : डोकी फोडायची गरज नव्हती, विषय शांतपणे…; उद्धव ठाकरेंचा निशाणा

- Advertisement -

शरद पवार यांची दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघात सभा होणार असल्याने पुणे-नाशिक महामार्गावर असणाऱ्या मंचर शहराजवळ रोहित पवार यांचे बॅनर झळकले आहेत. या बॅनर्सवर “वादा तोच, पण दादा नवा”, अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. मयुरशेठ भालेराव यांनी हे बॅनर लावून अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.  तसेच या बॅनरमुळे दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. याशिवाय दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मानले जायचे. मात्र, अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात शरद पवार सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य करताना त्यांच्याबद्दल काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : याआधी गुलाल उधळून फसवणूक, आता…; ठाकरेंचा हल्लाबोल

दरम्यान, अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पुणे जिल्ह्याचे शिरूरचे आमदार वगळता जवळपास सर्वच आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत. अजित पवार पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची ताकद वाढली आहे. त्यामुळे अजित पवार यांची यापूर्वीपासूनच कार्यकर्तांमध्ये ‘दादा’ म्हणून ओळख आहे. मात्र आता दिलीप वळसे पाटलांच्या मतदान संघात “वादा तोच, पण दादा नवा” अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पुण्याच्या दादांची जागा शरद पवार गटातील आमदार रोहित पवार घेत असल्याची बँनरबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -