घरमहाराष्ट्रअनिल देशमुखांचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम वाढला, न्यायालयीन कोठडीत २७ डिसेंबरपर्यंत वाढ

अनिल देशमुखांचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम वाढला, न्यायालयीन कोठडीत २७ डिसेंबरपर्यंत वाढ

Subscribe

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. १०० कोटी वसुली प्रकरणात तुरुंगात असलेल्या अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. तथापि, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुख यांनी पैशांची मागणी केली नसल्याचा मोठा खुलासा केला. मात्र, अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.

अनिल देशमुख यांची मंगळवारी न्यायालयीन कोठडी संपणार होती. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना १४ दिवसांची म्हणजेच २७ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. अनिल देशमुख सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत.

- Advertisement -

परमबीर सिंह यांना मुंबई आयुक्तपदावरुन हटवल्यानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत राज्यात खळबळ उडवून दिली होती. या पत्रात अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेला १०० कोटींची खंडणी जमा करायला सांगितल्याचा गंभीर आरोप केला. मात्र, या प्रकरणाला आज वेगळंच वळण लागलं आहे. बडतर्फ अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली.

- Advertisement -

चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझे याने आज जबाब नोंदवला. अनिल देशमुख यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी त्यांची उलट तपासणी केली. यावेळी सचिन वाझे याने अनिल देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी करण्यात आली नव्हती असं म्हटलं. त्याशिवाय आपण कोणत्याही बार मालकाकडून अथवा त्यांच्याशी संबंधितांकडून पैसे घेतले नाहीत असंही वाझेने आपल्या जबाबात म्हटलं आहे. आता चांदीवाल आयोगाने पुढील सुनावणी २१ डिसेंबर रोजी ठेवली आहे.


हेही वाचा – अनिल देशमुखांनी कधीच पैशांची मागणी केली नाही; चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेचा मोठा खुलासा


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -