घरमहाराष्ट्र11th Admission 2021: 'या' जिल्ह्यांमध्ये होणार ११ वी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया

11th Admission 2021: ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार ११ वी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया

Subscribe

अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा हायकोर्टाने रद्द केल्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात नवा आदेश जाहीर केला आहे. अकरावी प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु केली असून MMRDA विभागासाठीच्या प्रक्रियेची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेेच प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर केलं आहे.

या वेळापत्रकानुसार, २०२१-२२ मध्ये राज्यातील, मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.११वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. सदर ५ ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत संलग्न आहे. उक्त पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील.

- Advertisement -

मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.११वी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते. न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करणेसाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा 14 ऑगस्ट, 2021 पासून सुरु करण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रम देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल. यापूढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.

- Advertisement -

टीप– मोबाईल अँप डाऊनलोड करणेची लिंक संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.

https://11thadmission.org.in

ईमेल- [email protected]


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -