घरताज्या घडामोडीCorona Update: औरंगाबादमध्ये आढळले १३४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण!

Corona Update: औरंगाबादमध्ये आढळले १३४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण!

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी १३४ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १० हजार ५३८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ३९२ जणांचा मृत्यू झाला असून ५ हजार ९८६ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. तर सध्या ४ हजार १६० जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉईंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४ आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ८५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

अँटिजन टेस्टमध्ये ८५ व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह

दरम्यान औरंगाबाद कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने अत्यावश्यक वस्तू विक्रेत्यांची अँटीजन टेस्ट करणाच्या निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवार अत्यावश्यक वस्तू विक्रेत्यांच्या अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये ८५ विक्रेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे तसेच जे विक्रेते निगेटिव्ह आले आहेत त्यांना महापालिकेकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यानंतरच निगेटिव्ह आलेल्या विक्रेत्यांना अत्यावश्यक वस्तू विक्री करता येणार आहे, याबाबतची माहिती औरंगाबाद पालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे. शनिवार औरंगाबाद शहरात २२ ठिकाणी अँटीजन टेस्ट करणाचे कॅम्प लावण्यात आले होते. शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत ४ हजार २७४ विक्रेत्यांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ८५ विक्रेत्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Update: जगातील कोरोना बळींच्या संख्येने ओलांडला ६ लाखांचा टप्पा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -