घरमहाराष्ट्रमविआच्या भ्रष्टाचाराची 20-20 सुरू सरकारला बेवड्यांची चिंता

मविआच्या भ्रष्टाचाराची 20-20 सुरू सरकारला बेवड्यांची चिंता

Subscribe

गडचिरोलीतून जनआक्रोश मोर्चाची सुरुवात

महाराष्ट्रात बेवड्यांचे सरकार आले, त्यांना शेतकर्‍यांपेक्षा बेवड्यांची जास्त चिंता आहे. कोरोना काळात आर्थिक विंवचनेत सापडलेल्या वेश्यांना 5 हजारांची मदत करण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली, पण वेश्यांना दिले जाणार्‍या पैश्यांवरही सरकारही डल्ला मारला, हे सरकार डल्लेबाज आहे. ’जाऊ तिथे खाऊ’ अशी महाविकास आघाडी सरकारची नितीअसल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.

भाजपच्या महाजनआक्रोश मोर्चाची सुरुवात गडचिरोली येथून करण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले, कोरोनाकाळात आदिवासींना मदत करा, असा आक्रोश आम्ही करत होतो. पण, राज्य सरकारने दारू दुकानदारांना मदत केली. हे राज्य सरकार आपला आवाज दाबू शकत नाही, या सरकारमध्ये आवाज दाबण्याची हिंमत नाही. जनता आमचा आवाज आहे. जनतेवर अन्याय सहन करणार नाही. अन्याय झाला तर ही जनता तक्त पालटून टाकेल. राज्य सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. महाविकास आघाडी सरकारची राज्यात भ्रष्टाचाराची 20-20 मॅच सुरू आहे. विशेष म्हणजे दोन्ही टीम यांच्याच आहेत. काहीही झाले, तरी 2024 ला भाजपचे बहुमताचे सरकार सत्तास्थानी असेल. आम्ही सरकार आणतो म्हटले की यांना आपले सरकार पडते की काय असे वाटायला लागते आणि ते भ्रष्टाचार करायला लागतात, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

बेवड्यांची जास्त चिंता
कोरोनात यांनी बारमालकांचे भले केले. या सरकारने दारूच्या लायसन्सची फी 50 टक्के कमी केली. परदेशी दारूवरचा कर अर्धा करण्याचे काम या सरकारने केले. पण, गडचिरोली, नंदूरबारमधील शेतकर्‍यांचे वीज बिल 50 टक्के कमी करावे, असे त्यांना वाटले नाही. या महाराष्ट्रात बेवड्यांचे सरकार आले आहे. या सरकारला गरिबांची नाही, तर बेवड्यांची चिंता अधिक आहे, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

वेश्यांचे पैसे नातेवाईकांना
मुंबईतील बिल्डरांचा कर थकला आहे, हिंमत असेल तर तो वसूल करा. पण हे सरकार बिल्डरांवर मेहरबान आहे. कारण त्यांच्याकडून मालपाणी मिळते. म्हणून तेथे ढिल आणि आमच्या शेतकर्‍यांकडून जुलमी वसुली सुरू आहे.

- Advertisement -

कोरोनात वेश्यांना द्यायचे पैसे यांनी ते आपल्या नातेवाईकांना दिले. वेश्यांना द्यायच्या पैशावर डल्ला वापरणार्‍यांना काय म्हणतात. संजय राऊत तो शब्द नेहमी वापरतात. तुम्हाला देखील माहिती आहे. तो शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल. कारण या सरकारमध्ये वेश्यांना द्यायच्या पैशांवर डल्ला मारणारे डल्लेबाज पाहायला मिळतात, फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या काळात गेली दोन वर्षे आमच्या गरिबांकरिता मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला. हजारो टन अन्नधान्य या महाराष्ट्रात आले. अनेक गोडाऊनमध्ये तांदूळ-गहू सडला, पण मोदींचे नाव होईल म्हणून या सरकारने गरिबांपर्यंत अन्नधान्य देखील पोहचू दिले नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला.

धानाचे पैसे किती जिल्ह्यांना द्यायचे. विदर्भातील 5 आणि कोकणातील 3 जिल्हे. पण, हे 125 कोटी रुपये सुद्धा सरकार द्यायला तयार नाही. मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचा अध्यक्ष 400 कोटींचा भ्रष्टाचार करतो. काय सांगायचे? बांधावर जाऊन 50 हजार देऊ. पण, आज स्थिती काय आहे? 5 हजार रुपये शेतकर्‍यांना द्यायला तयार नाही. आमच्या पाठीत सोडा, या सरकारने सामान्य माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा हल्लाबोलही फडणवीस यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -