घरमहाराष्ट्रमुंबईसाठी 25 दिवस धोक्याचे; समुद्रात उंच लाटा उसळणार

मुंबईसाठी 25 दिवस धोक्याचे; समुद्रात उंच लाटा उसळणार

Subscribe

मुंबई : मुंबईत कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. तर दुसरीकडे, मुंबईकर महागाईच्या झळा व वाढत्या उष्म्याने हैराण झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात 4 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीतील 25 दिवसांत समुद्रात 4.51 मीटर ते 4.88 मीटर उंचीच्या लाटा (High waves) उसळणार आहेत. जून महिन्यात पाच दिवस, जुलै महिन्यात सहा दिवस, ऑगस्ट महिन्यात आठ दिवस तर सप्टेंबर महिन्यात सहा दिवस असे एकूण 25 दिवस समुद्रात साडेचार मीटरपेक्षाही जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. जर त्याच दिवशी अतिवृष्टी झाल्यास मुंबईची तुंबई होऊन 26 जुलै 2005च्या पूरस्थितीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

पावसाळ्यात (Monsoon in Mumbai) या 25 दिवसांत समुद्रात मोठी भरती व उंच लाटा असतील त्यावेळी घराबाहेर पडताना मुंबईकरांनी आपली व आपल्या कुटुंबीयांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच, समुद्रात मच्छीमारी करणाऱ्या कोळी बांधवांनाही या कालावधीत मासेमारीसाठी मनाई केली जाऊ शकते. हौशी पर्यटकांनाही समुद्र किनाऱ्यावर फिरण्यास मनाई केली जाऊ शकते अथवा त्यांनाही या कालावधीत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

- Advertisement -

…तर 26 जुलैची पुनरावृत्ती
मुंबईत 26 जुलै 2005 रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी एका दिवसात 944 मिली मीटर पाऊस पडला होता, तर समुद्रात 4.50 मीटरपेक्षाही जास्त उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. त्यावेळी मुंबईतील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले होते. परिणामी मोठी जीवित व वित्तीय हानी झाली होती. मुंबईत यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत 4.50 मीटर पेक्षाही जास्त उंचीच्या लाटा तब्बल 25 दिवस समुद्रात उसळणार आहेत. त्याचवेळी अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

या दिवशी काळजी घ्या
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच 4 ते 8 जून (5 दिवस), त्यानंतर 3 ते 8 जुलै (6 दिवस), त्यानंतर 1 ते 6 ऑगस्ट आणि 30 व 31 ऑगस्ट (8 दिवस) तसेच, 1 ते 3 सप्टेंबर आणि 28 ते 30 सप्टेंबर (6 दिवस) असे एकूण 25 दिवस समुद्रात मोठी भरती येऊन उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये मुंबईकरांनी काळजी घ्यावी.

- Advertisement -

हेही वाचा – दारू फुकट मिळाली म्हणून इतका प्यायला की जागेवरच…, घटना वाचून धक्का बसेल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -