घरमहाराष्ट्र३ एप्रिलपासून बी. कॉमची परिक्षा

३ एप्रिलपासून बी. कॉमची परिक्षा

Subscribe

६२ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेस बसणार असतात. ही परीक्षा ३९६ परीक्षा केंद्रावर होणार आहे.

मुंबई विद्यापीठातील तृतीय वर्ष बी. कॉमच्या सहाव्या सत्राची परीक्षा ३ एप्रिल पासून सुरु होत आहे. ही परीक्षा २५ एप्रिल २०१९ पर्यंत चालणार आहे. या परीक्षेस ६२,३२५ विद्यार्थीं बसणार असून सात जिल्ह्यातील ३९६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होत आहे. ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परीक्षा विभाग सज्ज झाला आहे. मुंबई विद्यापीठात बी.कॉम ही महत्वाची परीक्षा असून या परीक्षेमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी दरवर्षी बसत असतात. याच मोठ्या परीक्षेने विद्यापीठाच्या उन्हाळीसत्राचा आरंभ होत आहे. यापूर्वी २५ मार्च पासून प्रथम सत्राच्या परीक्षा सुरु झाल्या. पण त्या परीक्षा पुनर्परीक्षार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आणि कमी विद्यार्थी असलेल्या होत्या.

मुलींची संख्या जास्त

तृतीय वर्ष बी.कॉम सत्र ६ च्या सुधारित अभ्यासक्रमात ५६,७७४ विद्यार्थी परीक्षेस बसत असून यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे. या परीक्षेमध्ये २९,९५८ विद्यार्थीनी असून २६,८१६ हे विद्यार्थी आहेत. तसेच ७५:२५ या पॅटर्नचे ५,५५१ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा ०३ एप्रिल पासून सुरु होत असून २५ एप्रिल २०१९ पर्यंत चालणार आहे.

- Advertisement -

बी. कॉमचा सुधारित अभ्यासक्रम

२०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून बी. कॉम या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. तसेच अभ्यासक्रमदेखील सुधारित करण्यात आलेला आहे. या परीक्षेपासून तृतीय वर्ष बी. कॉम सत्र ६ ला  सहा विषय असतील. तसेच या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका १०० गुणांची असणार आहे. परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असून ही परीक्षा सकाळी साडे दहा वाजता सुरु होऊन दुपारी दीड वाजता संपणार आहे.

दोन विषयाच्या परीक्षा आणि मुल्यांकन महाविद्यालयाकडे

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून मुंबई विद्यापीठात बीकॉमच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना तसेच अभ्यासक्रमही सुधारित करण्यात आलेला आहे. बीकॉम सत्र ५ आणि ६ च्या  अभ्यासक्रमातील क्षमता संवर्धन अभ्यासक्रम (Ability Enhancement Course – AEC ) या समूहातील दोन विषयाच्या परीक्षा आणि मुल्यांकन महाविद्यालय स्तरावर करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतलेला होता. यानुसार सत्र ५ च्या परीक्षा आणि मुल्यांकन महाविद्यालयीन स्तरावर झाले.

- Advertisement -

‘परिक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्यास विद्यापीठ प्राधान्य देईल’

बीकॉम अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेनुसार आणि सुधारित अभ्यासक्रमानुसार सत्र ५ आणि ६ च्या अभ्यासक्रमामध्ये पूर्वीच्या उपयोजित समुहाऐवजी (Applied Components) त्याचे रुपांतर क्षमता संवर्धन अभ्यासक्रमामध्ये (Ability Enhancement Course – AEC ) झाले आहे. यामध्ये  विद्यार्थ्याला २४ विषय देण्यात आलेले आहेत. या विषयामधून विद्यार्थी कोणतेही २ विषय घेऊ शकतो. विद्यार्थ्यांनी या (Ability Enhancement Course – AEC ) दोन पेपरच्या परीक्षेसाठी आपल्या महाविद्यालयात जाऊन परीक्षा द्यावी. सदर निकालानंतर सदर दोन विषयाच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्रमुल्यांकन आणि छायाप्रत (Revaluation & Photo Copy) देखील विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालय स्तरावर करण्यात येणार आहे. सदर परीक्षा मुंबईसह, ठाणे, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग व पालघर या जिल्ह्याच्या तसेच राज्याबाहेरीलसिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशातील एक परीक्षा केंद्रअसे एकूण ३९६ परीक्षा केंद्रावर घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी परीक्षा विभागातील हस्तलिखित विभाग, परीक्षा आणि निकाल विभाग, कॅप  विभाग, संगणक विभागातील अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी तयारी केली आहे. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी या परीक्षेच्या सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी  परीक्षा वेळेवर सुरु करुन, परीक्षांचे  निकाल  वेळेवर  जाहीर  करण्यास विद्यापीठाचे  प्राधान्य राहील असा विश्वास डॉ.  विनोद पाटील  यांनी  व्यक्त केला.

मुंबई हि भारताची वित्तीय राजधानी असल्याने येथे वाणिज्य शाखेची निवड विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर करतात. या दृष्टीने बी.कॉम ही परीक्षा महत्वाची आहे. या परीक्षेचा निकाल लवकरच लावण्याचा विद्यापीठ करणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा.
 
– डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ 
 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -