घरक्राइमकथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल

कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल

Subscribe

मुंबई | माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधाक मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकरांवरील गुन्ह्यांची नोंद झाली आहे. बॉड बँग खरेदीत किशोरी पेडणेकरांनी घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा घोटाळा कोरोना काळात झाला होता. या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकरांसह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोविड काळातील टेंडर प्रक्रियेतील हा घोटाळात किशोरी पेडणेकर सहभागी होत्या, असे ईडीने म्हटले होते. यामुळे किशोरी पेडणेकरांवर चौकशी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळता रंगल्या होत्या. यानंतर किशोरी पेडणेकरांनावर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी किशोरी पेडणेकरांवर आयपीसी कलम 420 आणि 120बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कोविडमुळे मृत्यू झालेल्यांना नेहण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉडी बँग 2000 रुपयांऐवजी 6800 रुपयांना खरेदी केल्या असून बॉडी बँगचे कंत्रात किशोरी पेडणेकरांच्या सूचनेनुसार झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. कोविड काळात किशोरी पेडणेकर या बीएमसीच्या महापौर होत्या.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -