घरमहाराष्ट्रगोव्यात नौदलाच्या सतर्कतेमुळे स्पाइसजेटच्या प्रवासी विमानाचा टळला अपघात

गोव्यात नौदलाच्या सतर्कतेमुळे स्पाइसजेटच्या प्रवासी विमानाचा टळला अपघात

Subscribe

गोव्याच्या दाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही दुर्घटना होता होता टळली. आज सकाळी ही घटना घडल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली.

स्पाइस जेटच्या प्रवासी विमानाच्या अपघाताची घटना थोडक्यात टळली. नौदलाच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला. गोव्याच्या दाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही दुर्घटना होता होता टळली. आज सकाळी ही घटना घडल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली.

अशी घडली घटना?

गोव्याच्या दाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरतहून येणारे स्पाइसजेटचे SG 3568 हे प्रवासी विमान उतरणार होतं. पण त्याचक्षणी या विमानाचे नोझ लँडिंग गिअर पूर्णपणे उघडले नसल्याचे नियंत्रण कक्षाच्या लक्षात आले. त्यानंतर रनवे नियंत्रकाने तत्काळ एअर नियंत्रकाला विमान न उतरवण्याची सुचना दिली. त्यानंतर पायलट्सच्या टीमने या विमानाच्या सुरक्षित लँडिंगची तयारी केली. दोन वेळेला विमान उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ते शक्य होत नव्हते. अखेर तिसऱ्या वेळेला ते सुरक्षितरित्या धावपट्टीवर उतरवण्यास यश आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -