घरमहाराष्ट्रनक्की जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा पुन्हा एकदा प्रश्न

नक्की जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा पुन्हा एकदा प्रश्न

Subscribe

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यामांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जालन्यात झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी नेमकं जनरल डायर कोण? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून राज्यात जालन्यामध्ये झालेल्या लाठीचार्जमुळे तणावाचं वातावरण आहे. आता याच प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी यांच्यातर्फे करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील एक शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेलं होतं. या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब, सचिन अहिर, विनायक राऊत यांच्यासह इतर आमदारांचाही समावेश होता. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यामांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जालन्यात झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी नेमकं जनरल डायर कोण? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. (Aaditya Thackeray again raised question that who is General Dayar in Jalna case )

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

- Advertisement -

लाठीचार्ज झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि इतर नेते जालन्यामध्ये पोहोचले होते. लाठीचार्ज करण्याची आवश्यकता नसते. अशा महत्त्वाच्या विषयात पोलीस विचारल्याशिवाय लाठीचार्जचा निर्णय घेऊ शकत नाहीत. आम्हीही सरकारमध्ये राहिलो आहोत. त्यामुळे मी तुम्हाला याची खात्री देऊ शकतो. अशा प्रकरणात मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडून आदेश दिले जातात, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणतात आम्ही आदेश दिले नाहीत, मग सरकार कसं चालू आहे. मुख्यमंत्र्यांना समन्स द्यावे यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली. अनागोंदी सरकार सुरू आहे. गद्दार, घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये खरे जनरल डायर कोण? ज्यांनी लाठीचार्जचे आदेश दिले. त्यांची नावं लोकांसमोर येणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

- Advertisement -

तसंच, या प्रकरणात काय होईल ते मी आत्ताच सांगतो असं म्हणत त्यांनी सांगितलं की, समिती बसवली गेली आहे, रिपोर्ट आल्यानंतर एखाद्या आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्याचं निलंबन केलं जाईल. त्यामुळे ज्याने लाठीचार्जचे आदेश दिले त्याला काहीही होणार नाही, हे दुर्दैव आहे. राज्यपालांना यासाठीच आम्ही भेटलो. यावर कारवाई होईल, अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच, मुख्यमंत्र्यांना थोडी लाज उरली असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असंही विधान आदित्य ठाकरे यांनी यावेळी केलं.

(हेही वाचा :मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; मुख्यमंत्री शिंदेंनी दिले ‘हे’ आदेश )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -