घरठाणेशिंदे गटाच्या कोपरी शाखेच्या वतीने 'मुख्यमंत्री दहीहंडी उत्सव'; गोविंदासाठी 1 लाख 11...

शिंदे गटाच्या कोपरी शाखेच्या वतीने ‘मुख्यमंत्री दहीहंडी उत्सव’; गोविंदासाठी 1 लाख 11 हजारांची बक्षिसे

Subscribe

ठाणे : राज्यभरात उद्या मोठ्या उत्सव दहीहंडी सोहळा साजरा होणार आहे. यासाठी राज्यभरात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून गोविंदा पथक देखील दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहे. यंदा राज्यात अनेक राजकीय दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यात ठाणे आणि कल्याण संपर्क प्रमुख नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकात शिवसेना कोपरी विभागाच्या वतीने दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. ही दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला 1 लाख 11 हजार 111  रुपयांचे बक्षिसे देण्यात येणार आहेत. या दहीहंडीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत, अशी माहिती शिवसेना कोपरी पाचपाखाडी उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी आणि विभाग प्रमुख संतोष बोडके यांनी दिली.

कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यंदाचे उत्सवाचे दुसरे वर्ष असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. यंदा मुंबई-ठाण्यासाठी एक दहीहंडी, महिलांसाठी दहीहंडी आणि कोपरीकरांसाठी एक हंडी अशा तीन हंड्या येथे उभारल्या जातात. आठ थरांसाठी 21 हजारांचे रोख पारितोषिक तसेच सन्मानचिन्ह तर सात थरांची 11 हजार रुपये सहा थरांसाठी 6000 पाच थरांसाठी 5000 आणि चार थरांसाठी 3000  लावणाऱ्या गोविंदा पथकांना एकूण 1 लाख 11 हजार एकशे एकरा रुपयांचे रोख पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय स्थानिक गोविंदांना तसेच महिलावर्गासाठी आणि उत्तेजनार्थ पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कल्याण दहीहंडी उत्सव: परवानगीवरून ठाकरे-शिंदे गट आमने-सामने, मुंबई उच्च न्यायालय पडले मधे

गोविंदा पथकांच्या सुरक्षिततेसाठी सेफ्टी बेल्ट, रुग्णवाहिका, आणि डॉक्टर्स तैनात असणार आहेत . दहीहंडी सोहळ्यासाठी, दिवसभर मनोरंजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. यंदा या दही हंडी सोहळ्याला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असुन शिवसेनेचे आमदार आणि सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच मराठी सिनेनाटय कलाकारांची उपस्थिती हे या दहीहंडी उत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. अशी माहिती उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्याची टेंभीनाक्यावरील दहिहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला मिळणार एवढी रक्कम

महिला सक्षमीकरणासाठी हंडी

शिवसेना कोपरी शाखा च्या वतीने महिला सक्षमीकरण करण्यासाठी हंडी उभारण्यात येणार आहे. यात निर्भया महिला गोविंदा पथक विशेष हंडी फोडणार आहे.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हजेरी लावणार आहेत. मागील वर्षी पासून अशा प्रकारे वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -