घरमहाराष्ट्रAaditya Thackeray: आयुक्तांच्या बदल्यांसाठी खोक्यांची मागणी; आदित्य ठाकरेंचा आरोप

Aaditya Thackeray: आयुक्तांच्या बदल्यांसाठी खोक्यांची मागणी; आदित्य ठाकरेंचा आरोप

Subscribe

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका येथील प्रशासकांच्या बदल्या या प्रलंबीत आहेत. मागची 4 वर्षे या आयुक्तांच्या बदल्या करण्यात आलेल्या नाहीत. या सरकारमधील काही मंत्री त्यांच्याकडे खोक्यांची (पैशांची) मागणी करत आहेत. ठराविक रकमेची मागणी करत त्या आयुक्तांना बदलीची हमी दिली जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. यावेळी विधानभवनाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे. (Aaditya Thackeray Demand boxes for commissioner transfers Aditya Thackeray accuses the government)

आदित्य  ठाकरे म्हणाले की, हे सरकार पूर्ण झालेल्या उड्डाणपुलांचे उद्घाटन करण्यास विलंब करत आहे. तसंच, गोखले पुलंही सर्वसामान्यांसाठी खुला केला जात नाहीये. इतकचं नाही तर हे सरकार मागच्या 4 वर्षांपासून थांबलेल्या आयुक्तांची बदली देखील करीत नाही. मनपा आणि पुणे महानगरपालिकेतील काही प्रशासकांच्या बदल्या करण्यासाठी शिंदे सरकारमधील मंत्री खोक्यांची मागणी करत आहेत. या प्रशासकांची बदली ताबडतोब व्हावी, असा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे, असं असूनही मात्र खोक्यांची मागणी करत हे सरकार या बदल्या करत नसल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

- Advertisement -

नार्वेकरांवर लोकसभेची जबाबदारी

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वरळी मतदारसंघात गेले होते. याविषयी आदित्य ठाकरेंना विचारलं असता त्यांनी खोचक टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, आता कदाचित राहुल नार्वेकर यांच्यावर लोकसभेच्या तयारीची जबाबदारी दिली असावी.

(हेही वाचा: Sanjay Raut : आशिष शेलार यांच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “जे स्वतः बांडगूळ…”)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -