घरमहाराष्ट्रबनावट सह्यांच्या वाद; 'आप'चे खासदार राघव चढ्ढा यांचं राज्यसभेतून निलंबन

बनावट सह्यांच्या वाद; ‘आप’चे खासदार राघव चढ्ढा यांचं राज्यसभेतून निलंबन

Subscribe

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याच्या आरोपाखाली राघव चढ्ढा यांचं राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याच्या आरोपाखाली राघव चढ्ढा यांचं राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे संजय सिंह यांचं निलंबन वाढवण्यात आलं आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन कायम ठेवलं जाणार आहे, असं राज्यसभेकडून सांगण्यात आलं आहे.(  Aam Aadmi Party Rajya Sabha MP Raghav Chadha has been suspended )

….म्हणून राघव चढ्ढांचं निलंबन

राज्यसभेतील पाच खासदारांचा असा दावा आहे की, त्यांच्या संमतीशिवाय दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. हा प्रस्ताव आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी मांडला होता. भाजपचे तीन खासदार, बीजेडी आणि एआयएडीएमकेचे एक खासदार आहेत ज्यांनी निषेध नोंदवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.

- Advertisement -

उपसभापतींनी याची चौकशी केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे. या पाच खासदारांमध्ये सस्मित पात्रा, नरहरी अमीन, सुधांशू त्रिवेदी, नागालँडचे खासदार फांगनॉन कोन्याक आणि लोकसभेचे माजी उपसभापती थंबीदुराई यांचा समावेश आहे. थंबीदुराई हे AIADMK खासदार आहेत.

राज्यसभेत भाजप खासदार पियुष गोयल यांनी राघव चढ्ढा यांच्या प्रकरणाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, ही अत्यंत गंभीर बाब असून, सदस्याच्या नकळत त्यांचं नाव ज्याप्रकारे यादीत टाकण्यात आलं आहे, ते अत्यंत चुकीचं आहे.

- Advertisement -

गोयल म्हणाले की, राघव चढ्ढा बाहेर गेले आणि म्हणाले की त्यांनी काहीही चुकीचं केलं नाही आणि या प्रकरणावर ते ट्वीटही करत राहिले. विशेषाधिकार भंगाचा अहवान येईपर्यंत राघव चढ्ढा यांचं निलंबन कायम राहणार आहे.

संजय सिंह हे ज्या पद्धतीने वागले तेही अत्यंत निषेधार्ह आहे. निलंबनानंतरही ते सभागृहात बसून राहिले. त्यामुळे सभागृहाचं कामकाजही तहकूब करावं लागलं. हा खुर्चीचा अपमान आहे. संजय सिंह आतापर्यंत 56 वेळा वेलमध्ये आले आहेत, यावरून त्यांना सभागृहाचं कामकाज विस्कळित करायचं आहे, हे समजतं.

( हेही वाचा: Rahul Gandhi : लोकसभेत मोदींनी सलग दोन तास चेष्टा केली; मणिपूरप्रकरणी राहुल गांधींची टीका )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -