घरठाणेकळवा रुग्णालयात 'गब्बर इज बॅक', मृतावर सुरू होते पाच तास उपचार!

कळवा रुग्णालयात ‘गब्बर इज बॅक’, मृतावर सुरू होते पाच तास उपचार!

Subscribe

ठाण्यातील रुग्णालयाचा गलथान कारभार उघडकीस आल्यानंतर आठवण येते ती अक्षय कुमार याच्या 'गब्बर इज बॅक' चित्रपटाची. कारण या चित्रपटात देखील असाच एक सीन दाखविण्यात आला आहे. ज्यामध्ये एका मृत रुग्णावर रुग्णालय प्रशासनाकडून उपचार करण्याचे नाटक करण्यात येते.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात काल गुरुवारी (ता. 10 ऑगस्ट) एकाच दिवसात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. यावेळी एका मृत रुग्णालयावर पाच तास उपचार करण्यात आले. पण हा रुग्ण त्याआधीच मृत झाला होता. परंतु तरी देखील त्या रुग्णावर 5 तास उपचार करण्यात आले होते. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील हा गलथान कारभार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पण एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा रुग्णालयाकडून त्या रुग्णाच्या मृतदेहावर नेमके कोणते उपचार करण्यात येत होते, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. (‘Gabbar is back’ in Kalwa hospital, treatment for the deceased begins for five hours!)

हेही वाचा – Thane मनपा रुग्णालयात अनागोंदी कारभार, एकाच दिवसात 5 रुग्णांचा मृत्यू

- Advertisement -

ठाण्यातील या रुग्णालयाचा हा गलथान कारभार उघडकीस आल्यानंतर आठवण येते ती अक्षय कुमार याच्या ‘गब्बर इज बॅक’ (Gabbar is Back) चित्रपटाची. कारण या चित्रपटात देखील असाच एक सीन दाखविण्यात आला आहे. ज्यामध्ये एका मृत रुग्णावर रुग्णालय प्रशासनाकडून उपचार करण्याचे नाटक करण्यात येते. या चित्रपटात अक्षय कुमार एका रुग्णालयात जातो. तिथे गेल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांकडून होणारी नागरिकांची फसवणूक त्याच्या लक्षात येते. त्यानंतर तो एका महानगरपालिकेच्या रुग्णालयात जाऊन तिथून एका गरिब कुटुंबातील व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतो.

त्यानंतर अक्षय कुमार हा मृतदेह त्या मोठ्या खासगी रुग्णालयता घेऊन जातो आणि सदर व्यक्ती इमारतीवरून कोसळल्याचे सांगतो. तुम्हाला हवे तितके पैसे घ्या, पण माझ्या भावाला वाचवा, अशी विनंती तो डॉक्टरांकडे करतो. डॉक्टरही पैसे उकळण्यासाठी हो म्हणत त्या व्यक्तीच्या आयसीयूमध्ये घेऊन जातात. तुमचा रुग्ण गंभीर अवस्थेत आहे, असे सांगत डॉक्टरांकडून पैशांची लूट करण्यात येते. पण अखेरीस काही तासांनी या मृत रुग्णावरचे उपचार थांबवून आम्ही तुमच्या व्यक्तीला वाचवू शकलो नाही, असे डॉक्टरांकडून अक्षय कुमारला सांगण्यात येते. पण मी दाखल केलेली व्यक्ती कधीच मरण पावली आहे, असे सांगत अक्षय कुमारकडून भांडाफोड करण्यात येतो.

- Advertisement -

पंरतु, ठाण्याच्या रुग्णालयात झालेली घटना ही पैशांसाठी नाही तर रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडली आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांना एकाच दिवसात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. या रुग्णालयात उपचारच मिळत नसल्याची तक्रार अनेक रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. एखाद्या रुग्णाला ऍडमिट करायचे असल्यास त्याच्याकडून मोबाईल चार्जिंगचे 100 रु., आयसीयू बेडचे 200 रु., तर ऑक्सिजन बेडचे 200 रु. मागितले जात असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

प्रशासनाच्या या अनागोंदी कारभाराची माहिती मिळताच, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. जुना जितेंद्र आव्हाड असता तर कानशीलं लाल केली असती, असे म्हणत सुमारे पाच तास मृतदेह आयसीयूमध्ये ठेवणार्‍या डॉक्टरांना आव्हाडांनी चांगलेच फैलावर घेतले. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहराला स्मार्ट सिटी करत असताना, शहर भर कोट्यावधी रुपये खर्च करून रंगरंगोटी करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे याच ठाण्यातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र दिसून येत आहे. मल्टीस्पेशालिटी, टाटा कर्करोग रुग्णालयाची उभारणी करत असल्याच्या सांगण्यात येत आहे. असे असले तरी, सर्दी, ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयाची उभारणी करणे गरजेचे असल्याचे यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -